झांसी : उत्तरप्रदेशात सुरक्षा यंत्रणेचे कसे तीन-तेरा वाजलेत हेच दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये दोन तरुणांकडून एका अल्पवयीन तरुणीची भरदिवसा छेडछाड सुरू असल्याचं दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्दळ नसलेल्या एका कच्च्या रस्त्यावरून दोन तरुण एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं जंगलात घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसतच आहेत... धक्कादायक म्हणजे, या कृत्याचा एक जण व्हिडिओदेखील काढत आहे. तरुणी ओरडत आपल्या बचावाचा प्रयत्न करतेय... परंतु, हे गुंड तिची छेडछाड काढतच राहतात. त्यांना कुणाचाही धाक नाही... ना नागरिकांचा ना पोलिसांचा... 


हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. या प्रकरणात पोलिसांना एका आरोपीला अटक केलीय.