नवी दिल्ली : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कारासारखे दुष्कृत्य करण्याच्या आरोपात आठ जणांना ताब्यात घेण्यात आलयं. यामध्ये पिडित मुलीचा प्रियकरदोखील आहे. पोलिसांनी रविवारी अभिषेक (१८), रिंकी(३०), रोहित (२२), मुकेश (२५), इंतजार (३३), हीना (२७) आणि अशोक गोयल (३८) यांना दिल्ली, गुरूग्राम आणि गाझियाबाद येथून अटक केली. या सर्वांनी अल्पवयीन मुलीला राजधानी दिल्लीतील विविध ठिकाणी नेत दुष्कृत्य केलं.  १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी अभिषेक या आपल्या प्रियकरासोबत घरातून पळाली. ३० जुनला ती पश्चिम दिल्लीच्या सुल्तानपुरी भागातून गायब होती. अभिषेक तिला घेऊन हरिद्वारला गेला आणि तिच्यासोबत दुष्कृत्य केलं.


रवीनेही 'डाव' साधला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन-चार दिवसांनी तो दिल्लीला आला आणि जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकात थांबला. इथे त्याची ओळख रवीशी झाली. रवीने अभिषेकला नोकरी देण्याच आश्वासन दिलं आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे आपल्या घरी राहण्याची जागा दिली. दुसऱ्या दिवशी त्याने अभिषेकला गुरूग्राम इथं सोडून घरी येऊन मुलीसोबत दुष्कृत्य केलं. त्यावेळी रवीची लिव्ह इन पार्टनर रिंकी घरी नव्हती. रवी आणि रिंकी यांनी या अल्पवयीन मुलीला हीना आणि इंतजार नावाच्या तस्करांना विकले. दोन्ही तस्करांनी स्पा मालक अशोक गोयलशी संपर्क करुन विकले. अशोक गोयलने तिला आपल्या स्पामध्ये कैद करून दुष्कृत्य केलं. त्याने तिला आपल्याकडे आलेल्या ग्राहकांसोबत संबध ठेवण्यास भाग पाडले.


पोलिसांचा शोध सुरू 


अल्पवयीन मुलगीच्या शोधात असलेल्या अभिषेकने रवीकडे विचारणा केली पण योग्य उत्तर न मिळाल्याने पोलिसात तक्रार केली. सुल्तानपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अल्पवयीन मुलीला स्पा मधून बाहेर काढण्यात आले. तिची काऊंसिलिंग सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत याची चौकशी सुरू आहे.