२०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी, काँग्रेसचे आघाडीचे प्रयत्न
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधीपक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानी आयोजित केलीय. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आघाडी बांधण्याच्या प्रयत्न काँग्रेसनं सुरु केलाय.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधीपक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानी आयोजित केलीय. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आघाडी बांधण्याच्या प्रयत्न काँग्रेसनं सुरु केलाय.
त्याचाच एक भाग म्हणून या मेजवानीचं आयोजन करण्यात आलंय. मेजवानीला भाजप विरोधाच्या १८ राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, द्रमुक या पक्षांचा समावेश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्य पहिल्या टप्प्यातही विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी केला होता.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी, सीपीआयचे नेते डी राजा, डीएमकेच्या कनिमोझी, सपाचे समहासचिवर रामगोपाल यादव, लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव, विहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी, शरद यादव आदींसह नेते उपस्थित आहेत.