मुंबई : भारताच्या वैज्ञानिकांनी अंतराळात ३०० किलीमीटर दूर एक लाईव्ह सेटेलाईट अवघ्या तीन मिनिटांत पाडण्यात यश मिळवलंय. याद्वारे एलईओ उपग्रहविरोधी क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरित्या पार पडलीय. लाईव्ह एलईओ सॅटेलाईट अर्थात लो अर्थ ऑर्बिट उपग्रह (LEO Setelites /  Low Earth Orbit setelite) एका ऍन्टी सॅटेलाईटद्वारे (A-SAT) पाडलं गेलंय. उल्लेखनीय म्हणजे केवळ तीन मिनिटांत हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आलंय. 'मिशन शक्ती' असं या कठिण ऑपरेशनचं नामकरण करण्यात आलंय. बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधत ही माहिती दिलीय. सोबतच त्यांनी भारतीय वैज्ञानिकांचं या कामगिरीबद्दल कौतुकही केलंय. या मोहिमेद्वारे भारतीय वैज्ञानिकांनी मोहिमेच सर्व उद्देश प्राप्त केलेत. भारतीयांसाठी हा गौरवास्पद क्षण आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.


भारताचं 'मिशन शक्ती'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- भारतानं एका एन्टी सॅटेलाईट हत्याराद्वारे (Anti-satellite weapon) पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) केवळ तीन मिनिटांत एक लाईव्ह सॅटेलाईटला पाडून एक ऐतिहासिक कामगिरी केलीय.


- या मोहिमेद्वारे, चाचणी म्हणून भारतानं आपलाच एक निकामी झालेला परंतु, पृथ्वीकक्षेत ३०० किलोमीटर उंचीवर फिरणारा उपग्रह केवळ तीन मिनिटांत पाडला. पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या उपग्रहाला केवळ ९० मिनिट लागतात. 


- या मोहिमेला मिशन शक्ती असं नाव देण्यात आलं होतं.


- 'मिशन शक्ती'द्वारे भारत अंतराळातही 'महाशक्ती' म्हणून समोर आलाय.


- भारतीय सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.


- एन्टी सॅटेलाईटद्वारे भारतानं अंतराळातही आपल्या सुरक्षेची खातरजमा केलीय. 


- भारताच्या इस्रो आणि डीआरडीओ या संस्थांनी संयुक्तरित्या 'मिशन शक्ती' यशस्वी करून दाखवलंय.


एलईओ / एलईओ सॅटेलाईट म्हणजे काय?


- एलईओ / लो अर्थ ऑर्बिट अंतराळातली अशी एक कक्षा आहे जिथं सॅटेलाईट प्रक्षेपित केले जातात.


- एलईओ सॅटेलाईट हे एक असं 'टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट सिस्टम' आहे जे पृथ्वीतळापासून ४०० ते २००० किलोमीटर उंचीवर काम करू शकतं.  


- शत्रूकडून हेरगिरी करणाऱ्या किंवा नागरी कामांकरिता वापर करण्यासाठी जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्र काढणाऱ्या उपग्रहांचा वापर केला जातो, अशा उपग्रहांना रोखण्यासाठी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' ही उपयोगी ठरणार आहे.


- हेरगिरी करणारे हे सॅटेलाईट लो अर्थ ऑर्बिटमध्येच ठेवले जातात. अशा सॅटेलाईटना केवळ तीन मिनिटांत हाणून पाडण्याची क्षमता आता भारताकडे आहे.


ए-सॅट हत्यारं (ASAT weapon) म्हणजे काय?


- एन्टी सॅटेलाईट हत्यारं (Anti-satellite weapon) ही मुख्यत्वे सुरक्षेच्या दृष्टीने उपग्रहांना नष्ट करण्यासाठी तयार केली जातात.


- हेरगिरी करणाऱ्या अंतराळातील उपग्रहांना हाणून पाडण्याची अशी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' आत्तापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारतही याबाबतीत सक्षम झालाय.


- महत्त्वाचं म्हणजे, अद्याप कोणत्याही देशाकडून ए-सॅट हत्यारांचा वापर युद्धात शत्रूराष्ट्रांविरुद्ध करण्यात आलेला नाही.


- अनेक देशांनी आपल्या ए-सॅट क्षमता केवळ शक्ती प्रदर्शनासाठी तसंच आपले दोषपूर्ण उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरल्या आहेत.


भारताद्वारे विकसीत करण्यात आलेल्या ए-सॅट द्वारे या मोहिम पूर्ण करण्यात आलीय. त्यामुळे एखाद्या शत्रूराष्ट्रानं हेरगिरी करणारा उपग्रह धाडला तर त्याचा मागोवा घेऊन त्याला पाडण्याचं तंत्रज्ञान आता भारताकडे उपलब्ध आहे.