ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी भाजपाकडून हुकमी एक्का
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी 27 मार्चपासून मतदान सुरू होणार आहे.
कोलकाता : बंगालच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला कारणही तसचं आहे. बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आज भाजपमध्ये सामील झाले आहेत. काही वेळातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाताच्या ब्रिगेड परेड मैदानावरून मेगा रॅलीला संबोधित करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी सुपर स्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या रूपात भाजपला हुकमी एक्का मिळाला आहे. मिथुन चक्रवर्ती देखील मैदानावर दाखल झाले आहेत.
शिवाय त्यांनी जमलेल्यांना अभिवादन देखील दिला आहे. मिथुन यांच्यासोबत मंचावर कैलाश विजयवर्गीय, शिव प्रकाश, मुकुल रॉय यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित आहेत. मिथुन चक्रवर्ती निवडणुकच्या रिंगणात उतरणार नसून ते पक्षाला पाठबळ देणार असल्याचं समोर येत आहे.
गेल्या महिन्या मिथुन आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना भेटले होते. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आले. अखेर खुद्द मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजप पक्षात प्रवेश करत सर्व चर्चांना पुर्णविराम दिलं आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी 27 मार्चपासून मतदान सुरू होणार आहे. ज्यासाठी पंतप्रधान मोदी सभा घेतील. या निवडणुकीत सुमारे दहा लाख लोक उपस्थित राहतील असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.