`मोदीजी नेत्यांकडून शपथ घ्या, रेप करणार नाही, करू देणार नाही`; आप नेत्याचे वादग्रस्त ट्विट
उत्तर प्रदेशातील कठुआ आणि जम्मू-काश्मीर येथील उन्नाव मधील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांनीही सरकारला धारेवर धरले आहे.
नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात आमदार आणि नेत्यांचाच थेट समावेश असल्याचे पुढे आल्यापासून सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षावर (भाजप) टीकेची झोड उठली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार संजीव झा यांनीही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. मात्र, हे ट्विट काहीसे वादग्रस्त ठरले आहे. संजीव झा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मोदीजी म्हटले होते की, न खाऊंगा न खाने दूंगा. पण, मोदीजी आता आपल्या नेत्यांकडून शपथ घेतील काय की, बलात्कार करणार नाही आणि करूही देणार नाही. हिंदूस्तानला रोपिस्तान होण्यापासून वाचवा पंतप्रधान जी', असे ट्विट झा यांनी केले आहे.
ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया
दरम्यान, आमदार झा यांच्या ट्विटनंतर ट्विटरवर ते जोरदार चर्चेत आले. झा यांच्या ट्विटला प्रत्त्युत्तर देताना आदित्य मिश्रा नावाच्या एका युजरने म्हटले आहे, थोडेसे भान बाळगा, एका महान व्यक्तीने आपले जीवन इतरांच्या सेवेसाटी वाहून गेतले आहे. आपण, त्यांनाच बलात्कारी बोलत आहात. मोदींनी कोणावर बलात्कार केला आहे सांगा? आणि ज्यांनी बलात्कार केला त्यांना त्याची शिक्षा मिळाली. तुम्ही देश विकायला निगाला आहात. जरा स्वत:कडे पाहा. आणखी एक युजर्सने म्हटले आहे, दुख: मलाही आहे. मोदींनाही आहे. प्रत्येक प्राण्याला प्रत्येक जीवाला आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कडक कारवाई केली जाईल असे मोदी जाहीर सांगतात. पण, तुम्ही कोणत्या तोंडाने हे आरोप लावता? तुम्ही काय म्हणू इच्छिता, खोटारड्यांनो?
कठुआ आणि उन्नाव प्रकरणी काय म्हणाले मोदी?
उत्तर प्रदेशातील कठुआ आणि जम्मू-काश्मीर येथील उन्नाव मधील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांनीही सरकारला धारेवर धरले आहे. देशभरातील विरोधाची धार तीव्र झालेली पाहून पंतप्रधानांनाही या विषयावरचे आपले मौन सोडत भाष्य केले. गेले दोन दिवस ज्या घटना चर्चेत आहेत त्या सभ्य समाजाला शोभणाऱ्या नाहीत. हे अत्यंत निंदनीय आहे. एका समाजाच्या, देशाच्या रूपात या घटना आपल्या सर्वांसाठी लज्जास्पद आहे. देशात होणाऱ्या कोणत्याही राज्यातील परिसरातील अशा घटना मानवी संवेदनांना आव्हान देतात. पण, मी देशाला विश्वास देऊ इच्छितो न्याय मिळेल, संपूर्ण न्याय मिळेल. आमच्या कन्यांना न्याय मिळेल. समाजातील वाईट गोष्टी संपविण्यासाठी आपणा सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल.
झा यांच्या ट्विटवर आलेल्या काही प्रतिक्रिया