मुंबई : अस बऱ्याचदा होतं, आपल्या फोनची रिंग वाजलीयं, फोन वायब्रेट झालायं अस आपल्याला वाटतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही फोन खिशातून बाहेर काढून बघता.


पण कोणता फोन आलेला नसतो, ना कोणता मेसेज असतो.


पण तुम्ही तर स्पष्ट  ऐकलेलं असतं. कोणत्या भूताबिताचा कॉल तर नाही ? कान वाजत असतील असंही बऱ्याचदा वाटत राहत. अस झालंय का तुमच्यासोबत ?


तुम्ही अॅडिक्ट झालायत ?


तुम्ही तुमच्या मोबाईल फोनशिवाय किती वेळ राहू शकता ? १-२ तास ? मिनिटं ? पण तेव्हाही तुमचं मन फोनमध्येच गुंतलेलं असतं. 


सध्या सर्वांची लाईफस्टाईल बिझी झालीए. एकापेक्षा एक महत्त्वाचे कॉल्स येत राहतात. प्रत्येकवेळी आपण चॅटवर कोणाशी तरी बोलत असतो. 


गुलाम बनतोय ?


खिशातला फोन आपल्या शरीराचा हिस्सा बनून जातो.


आपण त्याचे गुलाम बनत चाललोयं. आपल्या डोक्यात काहीतरी विचार चाललेला असतो. 


आपल्याला वाटतं कोणत्या खास व्यक्तीचा फोन येईल. त्यामुळे आता फोन येईल असं सारखं सारखं वाटत राहतं.


आपण आपला फोन चेक करत राहतो.


'फॅंटम फोन सिंड्रम' 


याला 'फॅंटम फोन सिंड्रम' असं म्हणतात. यामध्ये काळजी करण्याचे कारण नाही. हा कोणता आजार नाही. केवळ याच नावचं इतक भारी आहे.