मुंबई :  मोबाईल फोन आता काळाची गरज आहे.. असं म्हणायला हरकत नाही. पण मोबाईलचा वापर प्रमाणाबाहेर केल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. अनेक भारतीयांची मोबाईल फोनमुळे झोप उडाली आहे. गेल्या 5 वर्षांत 2 लाख लोकांनी त्यांच्या झोपण्याच्या सवयींबद्दल सांगितले आहे. यावर्षी 30 हजार लोकांनी याबद्दल सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2021 ते 2022 वर्षां दरम्यान ग्रेट इंडियन स्लीप स्कोरकार्ड (GISS) ने एक सर्वे केला आहे.  ज्यामुळे समोर आलं आहे, की मोबाईल फोनमुळे तरुणांची झोप उडाली आहे. 


महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या झोपेवर सर्वात जास्त परिणाम मोबाईलमुळे होताना दिसत आहे. भारतात 59 टक्के लोक 11 नंतर झोपण्यासाठी जातात. तर 88 टक्के लोक झोपण्याआधी फोन पाहातात. 


मात्र, गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात 92% लोक असं करत होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 4 टक्के कमी लोक झोपण्यापूर्वी फोन तपासत आहेत. 74% लोकांनी त्यांच्या घरात झोपण्यासाठी वेगळी जागा तयार केली आहे.


तर दुसरीकडे 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी सांगितले की, त्यांच्या खोलीतील वातावरणामुळे त्यांची झोप भंग होत आहे. 18 वर्षांखालील 80 टक्के तरुणांना उठल्यानंतर त्यांना फ्रेश वाटत नाही. दर चार भारतीयांपैकी एकाला असे वाटते की त्यांना इनसोमनिया (Insomnia)  झाला आहे.


कोरोनापूर्वीच्या तुलनेत रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर राहण्याच्या सवयीत 57% वाढ झाली आहे. 31% स्त्रिया आणि 23% पुरुषांना वाटते की त्यांची झोप कमी झाली आहे. 38% महिला आणि 31% पुरुषांना असं वाटतं की सोशल मीडियामुळे ते उशिरापर्यंत उठतात. 


18 वर्षाखालील 50% तरुणांदेखील असे वाटते की त्यांना इनसोमनिया म्हणजे निद्रानाश झाला आहे.  Work From Home मुळे देखील अनेकांना रात्री उशीरापर्यंत जागं राहण्याची सवय लागली आहे. 


कोरोनापूर्वी म्हणजे 2020 च्या सर्वेमध्ये ही संख्या 83 टक्के होती. त्यानंतर 2022 च्या सर्वेमध्ये ही संख्या 48 टक्क्यांवर आली आहे.