Mobile Phone Thief: गुन्हेगारी विश्वात सर्वाधिक घटना या चोरीच्या असतात. चोरीच्या घटना घडल्यानंतर चोरांना पकडणं पोलिसांसमोर मोठं आव्हानं असतं. कारण चोरांच्या चोरी करण्याच्या पद्धती पाहून अनेकदा धक्का बसतो. अनेकदा तर चोर चोरी पचवतात आणि गुन्ह्याचा उकलच होत नाही. पण तंत्रज्ञानाच्या युगात सीसीटीव्हीमुळे चोरीच्या घटनांचा उलगडा होतो. काही चोरीच्या घटना दिवसाढवळ्या लोकांसमोर होतात. पण चोराला पकडणं काही कारणांमुळे कठीण होतं. अशीच एक चोरीची घटना पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. चोरानं मोबाईल इतक्या पटाईत चोरला की सदर व्यक्तीसमोर जीव वाचवावा की चोराला पकडावं? हा प्रश्न पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत, एक व्यक्ती रेल्वे फाटक बंद असल्याने बाइकवरून बसून मोबाईलवर निवांत बोलताना दिसत आहे. त्याच्यासोबत इतर काही लोक ट्रेन कधी जाते आणि फाटक कधी उघडतो याची वाट पाहात आहेत. पण त्या क्षणांचा फायदा घेण्यासाठी चोर सज्ज होता. रेल्वे फाटक बंद असल्याने चोर रेल्वे फाटक क्रॉस करत पलीकडे येतो. तसेच फोनवर बोलत व्यक्तीच्या आजूबाजूला फेऱ्या मारण्यास सुरुवात करतो. त्यानंतर ट्रेन येण्याचा अंदाज घेतो. ट्रेन अवघ्या सेंकदावर असताना त्याच्या हातून मोबाईल खेचतो आणि पलीकडे धाव घेतो. 



चोराचा पाठलाग करण्यासाठी सदर व्यक्ती बाइकवरून उतरून पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. पण ट्रेनचा वेग पाहता जीव वाचवावा की चोराला पकडावं असा प्रश्न पडतो. पण मोबाईलपेक्षा जीव महत्त्वाचा आहे, म्हणून सदर व्यक्ती माघार घेते. संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.


सदर चोरीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. ट्विटरवर चोरीचा व्हिडीओ 1.2 मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. फक्त 44 सेकंदात चोरांने मोबाईल चोरल्याने नेटकरी आवाक झाले आहेत. नेटकरी वेगवेगळ्या अंदाजात प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत. तसेच चोराला पकडून शिक्षा करण्याची मागणीही करत आहेत.