ड्रगतस्करी प्रकरणी मॉडलला अटक, इतक्या कोटींचा अंमली पदार्थ जप्त
मॉडल ते `ड्रग`स्टार, तस्करीसमोर वेबसीरीजची स्क्रिप्टही फिकी पडेल, वाचा संपुर्ण क्राईम स्टोरी
नवी दिल्ली : नवी दिल्लीत सिनेमा स्टाईलमध्ये ड्रगतस्करीचा प्रकार सुरु होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास करत संपुर्ण घटना उघडकीस आणली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मॉडल शुभम मल्होत्राला अटक केली आहे. तसेच शुभमची क्राईम पार्टनर 27 वर्षीय गर्लफ्रेंड कीर्ती हिला एक कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करतायत.
गुन्हे शाखेचे डीसीपी रोहित मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग डिलर दिल्ली विद्यापीठात अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार ड्रग डिलरचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. तपासात गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, शुभम मल्होत्रा नावाचा एक व्यक्ती ड्रग्ज विकतो. या व्यक्तीचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली.
कारच्या 'या' भागात ड्रग्ज लपवले
दरम्यान 12 जुलैला गुन्हे शाखेला माहिती मिळाली की शुभम हिमाचल प्रदेशात आहे, आणि तो त्याच्या होंडा अॅकॉर्डमधून चरस घेऊन दिल्लीला येणार आहे. त्य़ानुसार क्राईम ब्रँचच्या भरारी पथकाने दिल्लीच्या सिंधू सीमेवर सापळा लावला. शुभमची गाडी काही वेळाने येताना दिसली, मात्र मुसळधार पाऊस आणि गाडीचा वेग जास्त असल्याने पोलीस पथक शुभमची गाडी थांबवू शकले नाही. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने शुभमच्या गाडीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. कारमधून गुन्हे शाखेच्या पथकाला शुभम तर मिळालाच पण त्याची क्राईम पार्टनर मिळाली नाही. मात्र कारच्या झडतीत म्युझिक सिस्टीममध्ये ड्रग्ज सापडले. तब्बल 1 कोटीहून अधिक किंमतीचे हे ड्रग्ज होते.
चौकशीत काय म्हणाला?
शुभम हा दिल्लीत मोठा झाला आहे.त्यांची उंची आणि देखण्या दिसण्यामुळे मित्राने त्याला मॉडेलिंगमध्ये हात आजमावण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्याने गांभिर्याने घेत त्याने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले. यामध्ये लवकरच त्याला यशही आले. दरम्यान 2016 मध्ये तो चुकीच्या संगतीत सापडला. शुभमने चरस वापरण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्याला त्याचे व्यसन लागले. शुभमचा खर्च वाढला होता त्यामुळे त्याने दिल्ली युनिव्हर्सिटी सर्कल आणि पार्ट्यांमध्ये चरस पुरवायचा धंदा सुरु केल्याची माहिती त्याने दिली.
गर्लफ्रेडला बनवायचा ढाल
शुभमने त्याची गर्लफ्रेंड कीर्तीलाही जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढले. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, शुभम मल्होत्रा त्याची गर्लफ्रेडला कीर्तीला ढाल म्हणून वापराय़चा. दोघेही हिमाचलमधून चरस किंवा कोणतेही अंमली पदार्थ आणताना गाडीत उशी ठेवत असत. जेव्हा जेव्हा पोलीस थांबायचे तेव्हा कीर्ती पोटात उशी लपवून गरोदर पणाचे नाटक करायची. आणि अशाप्रकारे ते पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकायचे.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी शुभम मल्होत्रा आणि गर्लफ्रेंड कीर्तीला अटक केली आहे. तर या गॅगमध्ये आणखीण कोण-कोण आहेत याचा तपास सुरु आहे.