रेल्वे कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; खात्यात येणार एवढे पैसे
Railway Employees Bonus: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच दिवाळी साजरी करता येईल अशी घोषणा केली आहे.
Railway Employees Bonus: मोदी सरकारने दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. खास करुन रेल्वे कर्मचाऱ्यांवर सरकार आणि लक्ष्मी माता फारच प्रसन्न झाली आहे. या कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्त्यासहीत बोनस म्हणून एक हाती मोठी रक्कम मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.
किती रुपये खर्च होणार?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बोनस प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस म्हणून दिला जाणार आहे. याचा फायदा 13 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर 1,969 भार पडणार आहे.
मागील वर्षापेक्षा यंदा अधिक कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनसचा फायदा होणार आहे. केवळ नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्यांनाच बोनससाठी ग्राह्य धरलं जाईल. म्हणजेच ग्रुप सी आणि ग्रुप डी दर्जाच्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेकडून 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाईल. हा बोनस कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि सुरक्षा निश्चित करण्याच्या दृष्टीने दिला जाणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये 11.27 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता.
बोनस वाढवण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसचा हिशोब ग्रुप डी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या आधारावर केला जाईल. भारतीय रेल्वे कर्मचारी संघटनेनं रेल्वेला पाठवलेल्या पत्रामध्ये प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस वाढवण्याची मागणी केली आहे. सणासुदीच्या आधी दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम वाढवण्याची गरज आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार रेल्वेने जानेवारी 2016 रोजी 7 वा वेतन आयोग लागू करण्याची परवानगी दिली होती. मात्र प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसचा हिशोब आजही 6 व्या वेतन आयोगानुसार लावला जातो. यामध्ये बदल करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
78 दिवसांचा पगार म्हणून किती पैसे खात्यावर येणार?
78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळाल्यानंतरही या सी आणि डी ग्रुपमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर फार मोठी रपक्कम जमा होणार नाही. सी आणि डी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना एकूण 17 हजार 951 रुपये बोनस म्हणून मिळतील. महिन्याचा पगार 7 हजार रुपये गृहित धरुन हा हिशोब केला जातो. संघटनेनं केलेल्या माहितीनुसार, 6 व्या वेतन आयोगाऐवजी 7 व्या वेतन आयोगानुसार हा हिशोब केला जावा. असं झालं तर 17 हजार 951 रुपयांऐवजी या कर्मचाऱ्यांना 46 हजार 159 रुपयांचा बोनस मिळेल.