VIDEO : कारमध्ये बसता बरोबर मोदींनी काय केलं पाहा, तुम्ही देखील असं करता का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग करताना एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. ज्या विषयी अनेक लोकांना प्रेरणा मिळाली होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग करताना एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. ज्या विषयी अनेक लोकांना प्रेरणा मिळाली होती. आता नरेंद्र मोदी यांचा हा नवा व्हीडिओ तुम्हाला ट्रॅफिक नियमांचं पालन करण्याविषयी शिकवणार आहे. पीआयबीने हा पंतप्रधानांचा हा प्रेरणादाय़क व्ही़डीओ जारी केला आहे, ज्यात रस्ते सुरक्षेला अधिक महत्व देण्यात आलं आहे.
व्हीडिओत दिसून येतंय की, पंतप्रधान ज्या कारमध्ये बसतात, त्या कारचा सीटबेल्ट लगेच लावून घेतात. पीआयबी म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हा व्ही़डिओ जारी करताना हे देखील विचारलं आहे की, 'पंतप्रधान कारमध्ये बसताना सर्वात आधी सीटबेल्ट लावतात, मग तुम्हाला काय अडचण आहे?'
रस्ते सुरक्षा अभियानासाठी व्हीडिओ
रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत हा व्हीडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हीडिओ रोड, ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवेज मिनिस्ट्रीने जारी केला आहे. अभियानाचं नाव 'सड़क सुरक्षा जीवन रक्षा' आहे. व्हीडिओत पाहत येईल की पीएम मोदी आपल्या एसयूव्ही कारमध्ये बसण्याआधी लोकांना अभिवादन करतात आणि त्यानंतर सीटवर बसता बरोबर सीट बेल्ट बांधतात. पीआयबीने या व्हीडीओला नाव दिलं आहे. 'वीयर योर सीट बेल्ट', याचा उद्देश हाच आहे की, सर्वांनी सीट बेल्ट बांधावा.
शेकडो लोकांनी केली प्रशंसा
व्हीडीओ शेअर केल्यानंतर काही वेळाने ५ हजार लाईक्स आले आणि शेकडो लोकांनी प्रशंसा देखील केली. एका यूझरने लिहिलं आहे, सेफ्टीसाठी हे खूप चांगलं आहे, ही सुरूवात आहे. जेव्हा देशाचे पंतप्रधान नियमांचं पालन करीत आहेत, तर देशातील नागरीकही नियमाचं पालन करण्यास सुरूवात करतील. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार सीट बेल्ट बांधल्याने रस्ते सुरक्षा अपघातात, ४५ ते ६० ट्क्के मृत्यूचं प्रमाण घटलं आहे.