हेल्मेट घातलं तरी बसणार दंड; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
हेल्मेटसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहेत. वाहनधारकांनो आता हेल्मेट घातलं तरी दंड बसण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते अपघातात बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने दुचाकी धारकांना हेल्मेटची सक्ती केली आहे. विशेष म्हणजे दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मटची सक्ती करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये दुचाकीवर दोन्ही व्यक्ती हेल्मेट वापरतात. जर तुम्ही हेल्मेट घातला नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागतो. पण आता हेल्मेट घालूनही तुम्हाला दंड द्यावा लागू शकतो. यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वाहनचालकांनो ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. केंद्र सरकार हेल्मेटसंदर्भात काय निर्णय घेणार हे जाणून घ्या. (Modi government nationwide crackdown on faulty helmets Action will be taken against these people)
केंद्र सरकार देशभरात निकृष्ट दर्जाच्या दुचाकी हेल्मेटवर कारवाई करण्याचा विचार करत आहे. निकृष्ट दर्जाचे हेल्मेट हे रस्ते अपघातात मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमुख कारण असल्याने सूत्रांच्या हवाल्याने द मिंटच्या अहवालात ही माहिती देण्यात आलीय. केंद्र सरकारनेही याबाबत राज्यांना पत्र पावले आहेत.
हेल्मेट घातलं तरी बसणार दंड
राज्यांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना ISI नोंदणीशिवाय हेल्मेट विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेय. केंद्र सरकारने आपल्या पत्रात म्हटलंय की, हेल्मेट बीआयएस प्रमाणपत्राशिवाय रस्त्याच्या कडेला विकले जात असल्याचे निदर्शनास आलंय. हे रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमुख कारण आहे.
बीआयएस लायसन्स आणि बनावट आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट तयार करून विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे या पत्रात नोंदवण्यात आलंय. निकृष्ट दर्जाचे हेल्मेट बनविणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या देण्यात आलीय. भारतात बनवलेल्या औद्योगिक उत्पादनांना ISI चिन्ह दिलं जातं. हे दर्शविते की एखादे उत्पादन भारतीय मानक ब्युरो (BIS) ने विकसित केलेल्या भारतीय मानकांशी सुसंगत आहे. त्यामुळे यापुढे हेल्मेट विकत घेताना किंवा तुमच्याकडील हेल्मेट हे ISI प्रमाणपत्राच आहे का हे पाहून घ्या. अन्यथा तुमच्यावही कारवाई होण्याची शक्यता आहे.
भारतात सरकारने दुचाकी वाहनांमध्ये हेल्मेट घालणे बंधनकारक केलं असून दुचाकीवर दोन जणांना बसण्याची परवानगी असून दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. एवढंच नाही तर वाहन कंपन्यांकडून दुचाकी खरेदी करताना हेल्मेटही दिलं जातंय.
रस्ते अपघाता इतक्या लोकांचा बळी!
दुचाकीस्वारांची संख्येबद्दल बोलायच झालं तर जगात सर्वाधिक दुचाकी या भारतात वापरल्या जातात. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये देशात 63115 रस्ते अपघातांमध्ये 25228 लोकांचा बळी गेलाय. यापैकी सर्वाधिक अपघात दुचाकी वाहनांमुळे झाल्याच नोंद आहे. 2023 च्या तुलनेत, 2024 मध्ये रस्ते अपघातात 20.4% आणि मृत्यूंमध्ये 10.7% वाढ पाहिला मिळत आहे. त्यामुळे या गंभीर समस्येसंदर्भात केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.