नवी दिल्ली: राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक रविवारी झाली. या बैठकीत माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारची उलटगणती सुरू झाली आहे, अशी घणाघाती टीका सोनियांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीसाठी महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्याच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


गळाभेटीवरून पोस्टरबाजी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपलीय. गळाभेटीवरुन मुंबई काँग्रेसने पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केलीय. 'नफरत से नहीं प्यार से जितेंगे' असा टोला काँग्रेसने या पोस्टरच्या माध्यमातून भाजपला लगावलाय.