केंद्र सरकारचा `Aviation Reform`, देशात 5 नवीन विमानतळ, 50 नवीन मार्गही सुरु करणार
New Airport : देशातील अधिकाधिक भागात हवाई सेवा पोहोचावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने UDAN योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत ...
मुंबई : New Airport : देशातील अधिकाधिक भागात हवाई सेवा पोहोचावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने UDAN योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत हवाई सेवा लहान शहरांमध्ये सुरु करण्यात येत आहे. या दिशेने एक पाऊल पुढे जात सरकारने नवीन विमानतळ, हेलिपॅड आणि नवीन हवाई मार्ग सुरु करण्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारची ही नवी विमान वाहतूक सुधारणा आहे.
देशात नवीन विमानतळ, हेलिपॅड बांधणार
सरकारने जाहीर केले आहे की, देशात 5 नवीन विमानतळे बांधली जातील. 6 हेलिपॅड तयार होतील आणि 50 नवीन मार्गांवर विमान उड्डाणे सुरू होतील. त्यापैकी 30 मार्ग पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरमध्येच सुरू करण्याची योजना आहे. गुरुवारी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या मंत्रालयाची Union civil aviation minister Jyotiraditya Scindia)100 दिवसांची योजना सांगताना ही माहिती दिली. ते म्हणाले की योजना पूर्ण करण्यासाठी 30 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे.
येथे विमानतळ आणि हेलिपॅड बांधले जाईल
योजनेनुसार 5 विमानतळ गुजरातमधील केशोद, झारखंडमधील देवघर, महाराष्ट्रातील गोंदिया आणि सिंधुदुर्ग याशिवाय उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये बांधले जातील. हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली, मंडी आणि बद्दी याशिवाय उत्तराखंडमधील हल्दवानी आणि अल्मोडा येथे हेलिपॅड बांधले जातील.
यूपीत 30,000 कोटींची गुंतवणूक
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील जेवरमध्ये आणखी एक विमानतळ बांधले जाईल. हे विमानतळ केवळ उत्तर प्रदेशसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल. यामध्ये 30,000 कोटींची गुंतवणूक केली जाईल. उत्तराखंडच्या डेहराडून विमानतळावर 457 कोटींची गुंतवणूक केली जात आहे. तेथे नवीन टर्मिनल इमारत बांधली जाईल. यानंतर टर्मिनल इमारत सध्या 250 प्रवाशांच्या तुलनेत 1800 प्रवाशांना हाताळू शकेल.
बौद्ध सर्किटचा केंद्रबिंदू बनेल
सिंधिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे 255 कोटी रुपये खर्चून विमानतळ बांधण्यात येणार आहे. एअरबस 321 आणि बोईंग 737 सारख्या एअरबसेस देखील येथे उतरू शकतील. कुशीनगर बौद्ध सर्किटचा केंद्रबिंदू बनेल. त्रिपुराच्या अगरतला येथे 490 कोटी रुपये खर्चून विमानतळ बांधण्यात येणार आहे. गुंतवणुकीनंतर, त्याची क्षमता 1200 प्रवासी प्रति तास असेल.