नवी दिल्ली : चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झालेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळ्यानंतर मोदी लगेचच चीनला रवाना झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिषदे दरम्यान भारत आणि चीनमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा होणार याकड़ं जगाच्या नजरा लागल्यात. ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.


चीनच्या दक्षिणेकडील फुजियान प्रांतात शिआमेन शहरात ही परिषद होणार आहे. भारत-चीन संबंध, दहशतवाद याबाबत काय चर्चा होणार याकडेही सा-यांच्या नजरा लागल्यात. या परिषदेत दहशतवादाचा मुद्दा मांडू नये असं सुचवण्यात आलं होतं. मात्र याबाबत आमचा अजेंडा आम्ही ठरवू आणि त्यात कुणीही हस्तक्षेप करु नये अशा शब्दांत भारताने ठणकावलं होतं.