अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरातच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केलाय. त्यामुळे मोदींना महाराष्ट्रात नाही तर आता गुजरातमध्ये या प्रकल्पाच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद उच्च न्यायालयात १ हजार शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध करणारी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. भूमी अधिग्रहन कायद्यानुसार भूसंपादन करण्यात येत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचे भवितव्य अधांतरी आहे. महाराष्ट्र राज्यातूनही शेतकरी आणि राजकीय नेत्यांचा विरोध होत आहे. आधी चांगल्या सोयी-सुविधा द्या, प्रलंबित असलेली रेल्वेची कामे पूर्ण करा, मुंबईतील रेल्वेच्या विकासासाठी निधी द्या मगच बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहा, असा विरोधी सूर निघत आहे.