नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 'बजेट २०२०' सादर करत आहेत. या नव्या दशकातील अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अतिशय गुप्त ठेवण्यात येते. संकल्प लोकसभेत सादर होण्यापर्यंत यासंदर्भातील कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणून अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या सर्वच मंत्र्यांचे फोन बाहेर ठेवण्यात आले होते. अर्थसंकल्पातील एखादा महत्त्वाचा मुद्दाजरी बाहेर पडला तर अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. 


सांगायचं झालं तर, अर्थसंकल्पाची प्रक्रिया प्रदिर्घ काळापासून सुरू असते. ही माहिती बाहेर जावू नये म्हणून कमालीची गुप्तता पाळली जाते. त्याचप्रमाणे या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यात येते. 


याचसंदर्भात अर्थ मंत्रालयाने ३० जानेवारी रोजी ट्विट करत आपले अधिकारी कुलदीप कुमार शर्मा यांची प्रशंसाही केली होती. २६ जानेवारी रोजी शर्मायांच्या वडिलांचे निधन झाले होते. तरी देखील ते घरी गेले नव्हते. 


आज कुलदीप कुमार शर्मा त्यांच्या घरी जावू शकतात. शर्मा हे अर्थ मंत्रालयात प्रेसमध्ये डेप्युटी मॅनेजर आहेत. बजेत प्रक्रियेत जे सामाविष्ट आहेत ते ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांच्या घरी जावू शकत नाहीत. शिवाय यादरम्यान कुटुंबाशी बोलण्याचीही परवानगी दिली जात नाही.