अरवाल : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे. अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. बिहारमध्येही कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. असं असताना इथं आरोग्य विभागाचं एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमक काय आहे प्रकरण?
बिहारमधील अरवाल जिल्ह्यात खोट्या कोरोना टेस्टचा भांडाफोड झाला आहे. इतकंच नाही तर लसीकरणाच्या यादीतही बनवाबनवी करण्यात आली आहे. कोरोना चाचणी आणि लसीकरण यादीत खोटी नावं नोंदवण्यात आल्याचं उघड झालं आहे.  धक्कादायक म्हणजे देशातील बड्या नेत्यांबरोबरच सिनेसृष्टीमधील बड्या व्यक्तींच्या नावांचा यात समावेश आहे. 


27 ऑक्टोबर रोजी अरवाल जिल्ह्यातील कारपी ब्लॉकमध्ये या टेस्ट करण्यात आल्याचं म्हटलंय. धक्कादायक म्हणजे यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसंच अभिनेत्री प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार यांची नावं आहेत. 


कोरोना चाचणी आणि लसीकरणात चांगले स्थान मिळालेल्या अरवाल जिल्ह्याची बनवाबनवी यामुळे समोर आली आहे. अरवलमध्ये कोरोना चाचणीच्या नावाखाली सर्रास फसवणूक सुरु आहे आहे. यासोबतच कारपी सामुदायिक आरोग्य केंद्रातील रॅपिड अँटीजेन टेस्ट किटच्या तपासणीत शेकडो लोकांची बनावट नावं आणि क्रमांक बिनदिक्कतपणे लिहिण्यात आली आहेत.



दोन जण निलंबित
अरवलमधील कारपी रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार, अरवलमध्ये देशातील मोठ्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या आरोग्य समितीने आरोग्य विभागाला चांगलंच फटकारले आहे. या प्रकरणी दोन कॉम्प्युटर ऑपरेटर्सना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत. 


यादी पूर्ण करण्यासाठी बनवाबनवी
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाने मेगा लसीकरणाच्या सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सर्व आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण करण्यास सांगण्यात आलं होतं.  त्यामुळे आरवल जिल्ह्यात आरोग्य विभागाने खोटे नाव टाकून यादी पूर्ण केली. आता या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे अरवलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.