मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची पत्नी हसीन जहां हिने शमींविरूद्ध नुकसानीचा खटला दाखल केला होता. अलिपूरच्या न्यायालयाने हसीनचा दावा फेटाळून लावलाय. दरम्यान, मोहम्मद शमीकडे हसीनने दरमहा ७ लाख रुपये मागितले. मात्र न्यायाधीश नेहा शर्मा यांनी मात्र मुलीचा संभाळ करण्यासाठीची रक्कम देण्याचे सांगितलेय. त्यामुळे शमीला दरमहा ८०,००० रुपये पोटगी दाखल पत्नीला द्यावे लागणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमीच्या वकिलांनी सांगितले, माझा पक्षकार सुरुवातीपासून आपल्या मुलीचा खर्च उचलण्यास तयार होता. संभाळ करण्यासाठीचे पैसे देण्यात तयार होता. त्यामुळे आम्हाला याबद्दल कोणतीही समस्या नाही. पण हसीनने पुन्हा मॉडेलिंग सुरु केले आहे. त्यामुळे तो हसीनला पोटगी देऊ शकत नाही. दरम्यान, हसीनच्या वकिलाने सांगितले की, माझी क्लाइंट स्वत: चा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप तो सुरु झालेला नाही. त्यामुळे हसीन आता उच्च न्यायालयाकडे जाण्याची तयारी करीत आहे.



शमी सध्या इंग्लंड दौऱ्यावर 


मोहम्मद शमी सध्या टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर आहे, जेथे तो टीमसोबत कसोटी मालिकेत सहभागी झालाय. आतापर्यंत, या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि भारत आणि भारताने दोन्ही कसोटी सामन्यात गमावले आहेत. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये शमीने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


गंभीर आरोपाने सुरुवात झाली


या वर्षी मार्चमध्ये हसीनने आपला पती क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. हसीनने मोहम्मद शमी, मारहाण, बलात्कार, खूनाचा प्रयत्न, कौटुंबिक हिंसा आणि मॅच फिक्सिंग यांसारखे अनेक गंभीर आरोप केले होते. शमी हे आरोप फेटाळले होते. हसीनने अद्याप कुठलेही आरोप सिद्ध करू शकलेली नाही. अलीकडेच हसीनने आरोप केलाय, मोहम्मद शामी ईदनंतर लग्न करणार आहे. यावर शामीने सांगितलेय की, जर असे असेल तर मग मी तिला माझ्या लग्नात बोलवेन?


हसीनने पुन्हा मॉडेलिंग सुरु केलेय


 


या प्रकरणाच्या कार्यवाही दरम्यान, हसीन तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिने पुन्हा मॉडेलिंगकडे वळण्याचा निर्णय घेतलाय. हसीन जहांनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती मॉडेलिंग फोटो शूट करताना दिसत आहे. हसीन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. ती 'फतवा' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात हसीन एक पत्रकार भूमिकेत दिसेल. या सिनेमाचे चित्रिकरण वर्षाच्या अखेरीस सुरु होईल.