जबरदस्त रोमॅंटिक असतात त्या महिला ज्यांच्या `या` अवयवावर असते तिळ; तुम्हाला माहितीये का?
Til on Thighs: एखाद्या व्यक्तीच्या अवयवावर कुठे तिळ आहे. त्यानुसार त्याचा स्वभाव असतो. असे मानले जाते.
मुंबई : कर्म आणि नशिब सोबतच हात धरून चालत असते. परिश्रम कधीही वाया जात नाही. त्याचे फळ कधी ना कधी मिळतेच. परंतू म्हणतात ना.. अखेर नशिबात असेल तसंच घडतं. आपण भाग्यशाली आहोत हे शरीरावर असलेल्या तिळांच्या आधारावर अंदाज लावता येतो.
महिलांच्या पायावर तिळ असणे
ज्या तरुणी - महिलांच्या पायावर तिळ असते त्या खूपच सामाजिक असतात. त्यांना मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांशी गप्पा मारायला खूप आवडते. ज्या महिलेच्या उजव्या पायावर तिळ असते. ती चांगली पत्नी ठरते. ती महिला आपल्या जोडीदाराची प्रत्येक पावलावर साथ देत असते.
मांडीवर तिळ असणे
एखाद्या महिलेच्या डाव्या मांडीवर तिळ असल्यास ती सुखी आणि समाधानी असते. त्या महिलेला पतीकडून भरपूर प्रेम मिळते. जर एखाद्या महिलेच्या तळव्यावर तिळ असेल तर तिच्या आयुष्यात भरपूर प्रवासाचे योग असतात.
पुरूषांच्या पायांवर तिळ असणे
ज्या पुरूषाच्या उजव्या पायावर तिळ असते, ते बुद्धीमान असतात. अनेकजण व्यापारी होण्याची क्षमता ठेवतात. ज्या पुरूषांच्या डाव्या पायावर तिळ असते ताकदवान असतात.
रोमॅंटिक असण्याची निशाणी
जर एखाद्या व्यक्तीच्या मांडीच्या वरच्या भागात तिळ असेल तर ती व्यक्ती जबरदस्त रोमॅंटिक असते.
तिळाच्या आकाराचे महत्व
शरीरावरील तिळाच्या आकाराचेही महत्व असते. मोठे तिळ लोकांच्या जीवनात खास महत्वाचे ठरतात. लांबट तिळ साधारणतः चांगले परिणाम देतात. कपाळावर उजव्या बाजूला तिळ असल्यास व्यक्तीला ऐश्वर्य, सुख आणि भाग्याची प्राप्ती होते.
12 पेक्षा जास्त तिळ असणे योग्य नाही
ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर 12 पेक्षा जास्त तिळ असू नये. शरीरावर तिळ असण्याबाबत वेगवेगळ्या मान्यता आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)