मुंबई : काही गोष्टी असतात ज्या खूप जुन्या असतात किंवा काही गोष्टींच्या सुंदरते विषयी आपण ऐकूण असतो. मग त्यात कधी अप्रतिम अशी वास्तू असो किंवा एखादं चित्र असतं... असंच एक जगप्रसिद्ध चित्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे चित्र मोनालिसाचं (Mona Lisa) आहे. 


आणखी वाचा : MMS लीक झाल्यानंतर 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोराचा, बेड रूम फोटो लीक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिओनार्डो द विंची यांचं हे लोकप्रिय ठरलेलं चित्र आणि त्याच्या मागे असलेली त्याची कथा तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. आता या पेन्टिंगचा एक नवा लूक समोर आला आहे. हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मोनालिसाच्या या पेन्टिंगला आता भारतीय मेकओव्हर देण्यात आला आहे. (Mona Lisa Indian Makeover)


आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक








आणखी वाचा : वजनावर विनोद करणाऱ्या सुत्रसंचालकावर संतापली विशाख सुभेदार, म्हणाली...


मोनालिसाचा भारतीय मेकओव्हर ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. महाराष्ट्राची लिसा ताई (Mona Lisa Marathi Look), बिहारची लिसा देवी (Bihari Mona Lisa) असं म्हटलं आहे. तर, केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि बंगाल अशा वेगवेगळ्या परंपरेत ती न्याहाळून गेली आहे. तिच्या या लूकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ट्विटरवर @ThePerilousGirl नावाच्या अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांना फक्त लाईक केलं नाही तर त्यावर कमेंटचा वर्षाव करत रिट्विटही केले आहेत. (Mona Lisa Gets Indian Maharashtrian Bihari Rajasthani Makeover twitter is flooded with comments) 


आणखी वाचा : अरे देवा! पत्नीनेच नवऱ्याचं Ex Girlfriend सोबत लावलं लग्न, आता कसा सुरु आहे त्रिकोणी संसार? पाहा



आणखी वाचा : लेकिच्या वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमार भावूक; त्याचे Emotional शब्द जिंकतायेत मन


मोनालिसा हे पेन्टिंग 16 व्या शतकात लिओनार्डो द विंचीनं (Leonardo da Vinci) बनवलं होतं, ज्यावर आतापर्यंत जगभरात अनेक प्रकारचे संशोधन करण्यात आले आहेत. जर तुम्ही या 30x21 इंचाच्या पेन्टिंगचं वजन किती असेल याचा तुम्हाला अंदाज बांधता येणार नाही. ही पेन्टिंग जवळपास 8 किलो वजनाची आहे. एवढंच काय तर लिओनार्डोनं हे पेन्टिंग कोणत्या महिलेचं बनवलं आहे हे कोणालाही कळलेलं नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की ही पेन्टिंग फ्लॉरेन्समधील लिस घेरार्डिनी या इटालियन महिलेचं आहे. लिओनार्डो द विंचीनं स्वतः चा चेहरा पेन्ट करत त्याला महिलेचं रुप दिल्याचं देखील काही संशोधकांच म्हणणं आहे. 



लिओनार्डोसाठी हे पेन्टिंग बनवणं इतकं सोपं नव्हतं. सुमारे अडीच दशकांच्या मेहनतीनंतर (इ.स. 1503-17 पर्यंत) त्यांनी हे चित्र पूर्ण केलं. पहिली 12 वर्षे त्यांनी फक्त मोनालिसाचे ओठ काढण्यावर काम केल्याचं म्हटलं आहे.