Money Management Tips : आर्थिक चणचण मिटवणारा मंत्र; समजून घ्या आणि वापरून पाहा...
Money Management Tips : पैशांची बचत करणारा हा मंत्र तुम्हा कोणी सांगितलाच नसेल; समजून घ्या वापरून पाहा... कधीच भासणार नाही आर्थिक चणचण
Money Management Tips : 'लहानच राहिलो असतो तर बरं झालं असतं...', असं नोकरदार वर्गातील बरीच मंडळी म्हणताना दिसतात. आता यामागचं काय कारण? तर, वाढतं वय अपेक्षांचं वाढतं ओझंही आपल्यावर लादत जातं. अर्थात त्याकडे तुम्ही कसे पाहता हा महत्त्वाचा मुद्दा. अनेकदा या अपेक्षांच्याच बळावर आपण मोठे होत जातो, खूप काही शिकत जाते. स्वबळावर पैसेही कमावू लागतो. पण, खरा पेच तिथं निर्माण होतो जेव्हा मेहनतीनं कमाई करूनही हातात राहणारी रक्कम काही समाधानकारक नसते. मग पुन्हा तेच, पैशांची बचतच करता येत नाहीये... असं म्हणण्याचा पाढा सुरू.
गडगंज पगार असो किंवा तुटपुंजा पगार, महिनाअखेरीस अनेकांचाच एक सूर लागतो. तो म्हणजे पगार संपल्याचा. पण असं का होतं? आपला पैसा नेमका कुठे खर्च होतो? तुम्हालाही हे प्रश्न पडले आहेत का? हे प्रश्न पडणं अतिशय स्वाभाविक आहे. पण, यापुढं ही चिंता मिटू शकेल. कारण एक कमालीचा Formula तुम्हाला मदत करणार आहे.
काय आहे 50-30-20 नियम?
Saving करण्यासाठी तुम्हाला हा नियम बरीच मदत करेल. त्यामुळं तो कायम लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा. 50-30-20 म्हणजे कमाई- खर्च आणि बचत. म्हणजेच तुम्ही जितके पैसे कमवता त्याचा 50 टक्के भाग कौटुंबिक खर्च आणि गरजा भागवण्यावर खर्ट होतो. पण, उरलेला 50 टक्के भाग कुठे आणि कसा खर्च करायचा हे मात्र तुम्ही ठरवू शकता. यामध्ये 30 टक्के भाग तुम्ही स्वत:च्या आवडीनिवडींवर खर्च करु शकता तर, 20 टक्के भागाची बचत झालीच पाहिजे असा बेत आखू शकता. किंबहुना हा भाग जाणीवपूर्वक वाचवा. तुम्ही बचतीचं हे प्रमाण वाढवूही शकता.
हेसुद्धा पाहा : महाकाय देवमासे सापळा रचून करतात शिकार; त्यांचं तंत्र पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा; पाहा VIDEO
पैशांची बचत करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या सवयीवजा नियमांचं पालन काटेकोरपणे करावं लागेल
पैसे विचारपूर्वक खर्च करा. वायफळ खर्च शक्य तिथं टाळा, इथं सहजपणे पैशांची बचत होते.
पैशांची गुंतवणूक करण्याची सवय ठेवा. यासाठी आर्थिक तज्ज्ञांची मदत घ्या. एखादी अशी योजना निवडा ज्यामुळं तुम्हाला भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. पुढे गुंतवणुकीची सवय लावून घ्या.
अडीअडचणीच्या वेळी आरोग्य विमा, अपघात विमा किंवा तत्सम योजनेत पैसे गुंतवा.
कुटुंबाला सुरक्षितता देण्यासाठी टर्म इंश्योरंस घ्या. एखाद्या चांगल्या निवृत्तीवेतन योजनेत पैसे गुंतवा. स्वत:च्या खर्चांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही याची काळजी घ्या.