ग्वाल्हेर: मुख्याध्यापक कडक शिस्तीचे आणि मुलांसाठी अगदीच कठोर वागणारे असतात असं समजलं जातं. पण हेच मुख्याध्यापक पद जर माकडाच्या हाती गेलं तर? काय होईल याचा फक्त विचारच केलेला बरा. माकड म्हणजे अगदी उठाठेवी करणारं आणि उड्या मारणार पण चक्क माकडानं जे केलं ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका माकडाला तर चक्क मुख्याध्यापकाची खुर्चीच मिळाली. मग काय विचारता माकडाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने त्या खुर्चीवर बसून उड्या मारायला सुरुवात केली. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधल्या गावात घडल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


एनएनआयने दिलेल्या माहितीनुसार ग्वाल्हेरमधील एका गावात हे माकड मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. त्याचा व्हिडीओ युट्यूबवरही आहे. त्याला मुख्याध्यापकाची खुर्ची एवढी आवडली की हे माकड ती खुर्ची सोडायलाच तयार नव्हतं. त्याला खाली उतरवण्याचे त्यानंतर हुसकवण्याचे अनेक प्रयत्न करून झाले. 


शाळेचा स्टाफ माकडाला खुर्चीवर खाली उतरवण्याचे प्रयत्न करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर या माकडाला पळवून लावण्यात त्यांना यश मिळालं. सोशल मीडियावर या माकडाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक युझर्सनी तर या माकडाला ही खुर्चीच नाही तर पदही आवडलं असावं असं खोचकपणे म्हटलं आहे.