मुंबई: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्याचा प्रत्यय हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की येईल. एका छोट्याशा माकडानं आपला जीव वाचवत बिबट्यालाच अद्दल घडवली आहे. बिबट्याला त्याची शिकार न करता आल्यानं चिडलेला चपळ बिबट्या त्याच्या मागावर असतो मात्र माकड काही त्याच्या जबड्याला लागत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंगलात राहाणं म्हणजे अनेक धोके आणि पावलावर संकटांचा सापळा असं जंगलातील प्राण्यांचं आयुष्य. त्यातच बिबट्याची दहशत यामुळे अनेक प्राणी आपला जीव मुठीत घेऊन जगत असतात. एका छोट्या माकडाच्या मागे बिबट्या लागला. शिकार हातात लागल्यानं बिबट्या काही त्याची पाठ सोडायला तयार नव्हता. मात्र माकड चांगलंच हुशार निघालं. शक्तीसोबत त्याने आपली युक्तीही वापरली. 


IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की माकड झाडावर चढलं आहे. त्याच्या मागे बिबट्याही झाडावर चढला. बिबट्याच्या जबड्याला लागू नये म्हणून माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर टणाटणा उड्या मारत सुटला. त्याचा माग काढत बिबट्याही त्याच्या मागे उड्या मारू लागला. मात्र बिबट्याची पुरती दमछाक झाली.



22 हजारहून अधिक लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. माकडचाळ्यांसमोर बिबट्यालाही नमतं घ्यावं लागलं. बिबट्याला हार मानावी लागणार होती. माकडाच्या उड्या काही केल्या थांबत नव्हत्या. माकडाने युक्ती वापरून आपले प्राण वाचवले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ 2 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर अनेक युझर्सनी भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत.