मुंबई : सोशल मीडियावरील व्हिडीओ नेहमीच आपलं मनोरंजन करत असतात. हे व्हिडीओ नेहमीच आपल्याला आश्चर्यचकित करणारे किंवा हसवणारे असतात. असाच सगळ्यांना हसवणारा आणि मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने लोकांची मनं जिंकली आहेत. एवढेच नाही तर, लोकं या व्हिडीओचे जोरदार कौतुकही करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण नेहमीच माकडांना इकडे तिकडे उड्या मारताना किंवा झाडांवरुन फळे तोडून खाताना, शेतात धूडगुस घालताना पाहिले असेल. परंतु आज आम्ही तुम्हाला माकडाचे असे रुप दाखवणार आहोत की, तुम्हाला माकडाला असं पाहून त्याचे कौतुक तर वाटेलच, त्याच बरोबर तुम्हाला त्याचे आश्चर्य देखील वाटेल.


कारण या माकडाने असे काही केले ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल. हा माकड एका चाहाच्या दुकानावर चक्कं चहाची भांडी धुत आहे. सहसा आपण चहाच्या दुकानावर एखादा लहान मुलगा किंवा कोणत्याही माणसाला काम करताना आणि भांडी धूताना पाहिले आहे. परंतु  चहाच्या दुकानावर माकड काम करताना तुम्ही कदाचित याआधी कधीही पाहिलं नसेलं.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चहाच्या दुकानात लोकांची खूप गर्दी आहे. तेथे एका बाजूला माकड बसून भांडी धुत आहे. त्याला असं भांडी घासताना पाहून लोकांना धक्कां बसला आहे आणि लोकं त्या माकडाकडे कौतुकाने पाहात आहेत.


हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. ज्याने हा व्हिडीओ पाहिला आहे, तो प्रत्येक जण या माकडाच्या प्रेमातच पडला आहे. 


हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर 'ghantaa' या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहण्यापर्यंत सुमारे 2.5 लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. त्याचवेळी, लोकांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काही लोकं माकडाच्या या परिश्रमांचे कौतुक करत आहेत. तर काहीजणांचे असे म्हणणे आहे की, हे माकड माणसांपेक्षा चांगले काम करत आहे. तर काही जणांचे असे ही म्हणणे आहे की, माकडाने असे काम केल्याने दुकाना मालकाचे पैसे वाचतील कारण त्याला माकडाला फक्त पोटभर खायला द्यावे लागेल.