ताजमहाल, लालकिल्ला पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता
ताजमहाल आणि लाल किल्ल्यासह इतरही स्मारकं खुली करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे देशात ताजमहाल, लाल किल्ला यांसारखी स्मारकं बंद आहेत. परंतु आता ताजमहाल आणि लाल किल्ल्यासह इतरही स्मारकं खुली करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री आणि प्रहलाद सिंह पटेल (Prahalad Singh Patel) यांनी सांगितलं की, देशातील सर्व एएसआय संरक्षित स्मारकं 6 जुलैपासून संपूर्ण खबरदारी घेऊन उघडली जाऊ शकतात.
मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या आदेशानुसार 6 जुलैपासून एएसआय अंतर्गत येणारी सर्व स्मारके पूर्ण सुरक्षा आणि खबरदारीने उघडली जाऊ शकतात, असं सांगण्यात आलं आहे. ही स्मारके ज्या राज्य आणि जिल्ह्यात आहेत त्यांच्या नियमांनुसार ही स्मारके लोकांना भेट देण्यासाठी खुली केली जाऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) अंतर्गत या स्मारकांठिकाणी फिरण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP जारी करण्यात आलं आहे. यानुसार, पर्यटकांना मास्क घालणं अनिवार्य असणार आहे.
उत्तर प्रदेशात पोलीस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री, आठ पोलिसांचा मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे 17 मार्चपासून केंद्र सरकारद्वारे संरक्षित 3691 स्मारकं आणि पुरातत्व स्थळं बंद आहेत. या स्मारकांची, पुरातत्व स्थळांची देखरेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाकडून केली जाते.