हत्तींच्या एवढ्या मोठ्या झुंडी तुम्ही यापूर्वी पाहिल्या नसतील...
श्रीलंकेतील कॅंडी शहरापासून सुमारे दोन तासाच्या अंतरावर मिन्नेरिया नॅशनल पार्क अभयारण्यात जवळपास ३०० हत्ती एकाच ठिकाणी दिसतायत.
कोलंबो : श्रीलंकेतील कॅंडी शहरापासून सुमारे दोन तासाच्या अंतरावर मिन्नेरिया नॅशनल पार्क अभयारण्यात जवळपास ३०० हत्ती एकाच ठिकाणी दिसतायत. मिन्नेरिया अभयारण्याच्या मध्य भागात एक प्रचंड मोठं तळं आहे. या ठिकाणी पाणी पिण्यासाठी अक्षरशः हत्तींच्या झुंडीच्या झुंडी येतात . झी २४ तासचे प्रेक्षक उदय बिन्नीवाले यांनी एकाच वेळी एकत्र आलेल्या या हत्तीचा झुंड आपल्या कॅमेरात चित्रीत केला.