धक्कादायक ! ८ वर्षांच्या मुलीच्या डोक्यात शंभरहून जास्त किडे, डॉक्टरही हैराण
ती श्वासही ठिक घेऊ शकत नव्हती आणि तिला धड चालताही येत नव्हतं.
मुंबई : ८ वर्षाच्या मनिषा (बदलेलं नावं) ला ६ महिन्यांपासून डोकेदुखीचा त्रास सुरू होता. तिला मिर्गीचे झटके येत होते त्यानंतर तिला फोर्टिस हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं. सीटी स्कॅन केल्यानंतर जे समोर आलं ते तिच्या आईवडीलांना धक्का देणारं होतं. तिच्या डोक्यात १०० हून अधिक टेपवॉर्म अंडी असल्याचे दिसले. टेप वॉर्म अंडी तिच्या पोटातून रक्ताच्यामार्गे मेंदुपर्यंत पोहोचले. सुरूवातीला डॉक्टरांनी न्युरोसिस्टीसरकोसिस आजार असल्याचे निदान केले होते. तिचे वजन २० किलोपर्यंत वाढले होते. मेंदूची सूज कमी करण्यासाठी तिला हेवी ढोस द्यावे लागले. ती श्वासही ठिक घेऊ शकत नव्हती आणि तिला धड चालताही येत नव्हतं.
आजाराच निदानं
आजाराच निदानं झाल्यानंतर ऑपरेशन करून तिच्या ब्रेनमधून अंडी बाहेर काढण्यात आली. आता मुलीची तब्येत ठिक आहे. टेपवर्म संक्रमित खाल्ल्याने हे इन्फेकश झालं होतं. नर्व सिस्टिमच्या माध्यमातून अंडी डोक्यापर्यंत पोहोचली.आम्हाला या आजाराबद्दल काहीच माहीत नव्हते पण आम्ही खूप सौभाग्यशाली आहोत की आम्ही वेळेवर पोहोचलो आणि वेळेत उपचार सुरू झाले.
जीवाला धोका
मांस, कोबी आणि अशा पदार्थांमधून टेपवर्मचा किडा पोटाच्यामार्गे डोक्यापर्यंत पोहोचतो आणि तिथे अंडी देण्यास सुरूवात करतो. वेळेवर इलाज न केल्यास जीवाला धोकाही असतो असे फोर्टिस हॉस्पिटलचे न्यूरोलॉजीचे डायरेक्टर डॉक्टर प्रवीण गुप्ता यांनी सांगितले.