एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. सासूने सुनचं विवाहबाह्य संबंधाचा छडा लावला आहे. झालं असं की, सहा वर्षापूर्वी घरात सून आली. तर काही दिवसांनी त्यांनी सासरच्यांनी बाजूची खोली भाड्याने दिली. सूनचं आणि त्या भाडेकरुची मैत्री झाली. काही दिवसांमध्ये त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधात झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सासरच्या मंडळींना लपवून सूनेचे भाडेकरुशी अनैतिक संबंध सुरू झाले. एकदिवस रात्रीच्या वेळी सासूला अचानक आवाजाने जाग आली. तेव्हा सूनेच्या खोलीतून पाच वर्षांच्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला. सासू सूनेच्या खोलीकडे गेली असता तिला खोलीला बाहेरून कुलूप लावलेल दिसलं. हा सगळा प्रकार पाहून सासूला धक्का बसला.


सून कुठे गेली याचा शोध सुरु झाला. कुठे दिसत नसल्याने सासू भाडेकरुच्या खोलीकडे पोहोचली. सासूला संशय आला आणि त्यांनी भाडेकरुचे दार ठोकलं. तर काय तिथे सूनेला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 


हा सगळा प्रकर सासूने सुनेच्या आईला सांगितला. त्यावेळी सूनेच्या आईने जे उत्तर दिलं त्याने तर सासू हादरुन गेली. ती म्हणाली की, तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी त्यांनी दिली. यानंतर सासूने पोलीस स्टेशन गाठलं. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन पोलिसांनी सून, भाडेकरु आणि सूनेच्या आईविरोधात गुन्ह्याची नोंद केली. दरम्यान ही घटना आगरामधील बिंदू कटरा चौकी परिसरातील आहे.