Mother Left Newborn Daughter: महिलेला आधीपासूनच सहा मुली पुन्हा मुलगीच झाली. निराश झालेली महिला नवजात मुलीला (Newborn Baby Girl) रुग्णालयातच सोडून निघून गेली. त्याचबरोबर एक चिठ्ठीही तिने मुलीसोबत सोडली आहे. चिठ्ठीत तिने केलेले भावूक आवाहन वाचून तुमचेही डोळे पाणावतील. (Mother Left Her Newborn Baby Girl)


रस्त्यात सापडले बाळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील मथुरा गेट परिसरात गुरुवारी रात्री ११च्या सुमारास एका व्यक्तीला नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. इतक्या सुनसान रस्त्यावर लहान बाळाला पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. त्याने बाळाच्या पालकाचा इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे जवळपास त्याला कोणीच आढळले नाही. बाळाच्या जवळ जाताच त्याला तिच्याशेजारी एक चिठ्ठी सापडली. 


बाळासोबत सापडली चिठ्ठी


रामवीर असं त्या व्यक्तीचं नाव असून अवघ्या काही दिवसांच्या बाळाला कपड्यात गुंडाळलेले पाहताच त्याचा धक्का बसला. बाळाला उचलून घेत असताना तिथे त्याला एक चिठ्ठी सापडली. त्याने लगोलग बाळाला व सापडलेली चिठ्ठी उचलून घेत रुग्णालयात धाव घेतली. व तिथे असलेल्या डॉक्टरांना घडलेली घटना सांगितली. 


सेंकड हँड कार विकत घेताय, नुकसान होण्याआधी हा अहवाल एकदा वाचाच


तीन दिवसांची मुलगी


डॉक्टरांनी लगेचच नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करत तिच्यावर उपचार सुरू केले. भीषण उष्मा असतानादेखील मुलीला फारसे काही गंभीर लक्षणे नव्हती. तसंच, रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांकडूनही चिमुरडी बचावली त्यामुळं रुग्णालयातील डॉक्टरांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. डॉक्टरांनी तिची पूर्ण तपासणी केल्यानंतर मुलीचे वय अवघे तीन दिवस असल्याचे समोर आले. 


नवरा-नवरी अमेरिकेत, भटजीबुवा भारतात, असा पार पडला पुण्याच्या सुप्रियाचा विवाह, फी घेतली तब्बल... 


चिठ्ठीत भावूक आवाहन


नवजात मुलीच्या जवळ जी चिठ्ठी सापडली आहे त्यात मुलीच्या आईने भावूक आवाहन केले आहे. मला आधीपासूनच सहा मुली आहेत. माझी सासू मला खूप छळते. म्हणूनच मी हे पाऊल उचलले आहे. माझ्या मुलीला सांभाळा, खूप उपकार होतील, मला माफ करा, असा मजकूर या चिठ्ठीत लिहला आहे. 


भरतपूर जनाना रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ. हिमांशु गोयल यांनी म्हटलं आहे की, रुग्णालयातील परिसरात एका नवजात बाळ सापडलं होतं. बाळाची आईच त्याला सोडून गेली होती. बाळ अवघे तीन दिवसांचे आहे. सध्या बाळावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा आहे.