नवरा-नवरी अमेरिकेत, भटजीबुवा भारतात, असा पार पडला पुण्याच्या सुप्रियाचा विवाह, फी घेतली तब्बल...

Trending News In Marathi: अमेरिकेत राहणाऱ्या जोडप्याचा अनोखा विवाह पार पडला आहे. मुळची पुण्याची असणाऱ्या सुप्रियाचा हटके विवाह झाला आहे. 

Updated: May 26, 2023, 01:49 PM IST
नवरा-नवरी अमेरिकेत, भटजीबुवा भारतात, असा पार पडला पुण्याच्या सुप्रियाचा विवाह, फी घेतली तब्बल...  title=
bride and groom present in america and pandit in india married on video call online

Marathi Trending News: वर-वधु, नातेवाईक अमेरिकेत पण भटजीबुवा मात्र भारतात. (Bride And Groom) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिवनीत राहत असलेल्या भटजीबुवांनी अमेरिकत राहणाऱ्या जोडप्याचा विवाह लावला आहे. या अनोख्या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर या विवाहाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. (Bride And Groom In US) 

२१ मे रोजी हा विवाह पार पडला आहे. विवाहाचे स्थळ अमेरिका होते. जोडप्याचे सर्व नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तिथेच होते. तर, लग्नाच्या विधीचे मंत्र मात्र भारतातून उच्चारले जात होते. भारतातील एका गुरुजींनी इथूनच लग्नाचे मंत्र म्हटले. त्यानुसार अमेरिकेतील जोडपे लग्नाचे विधी करत होते. त्यांनी सांगितलेल्या सुचनेनुसारच जोडप्याने सप्तपदी घेतल्या.

सिवनी येथे राहणाऱ्या सुनील उपाध्याय यांचा मुलगा देवांश उपाध्यय हा नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत असतो. तिथेच त्याची ओळख पुण्याच्या सुप्रियासोबत झाली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कामाचा व्याप अधिक असल्याने त्यांना भारतात येऊन लग्न करणं अशक्य होतं. दोघांनीही त्यांच्या घरच्यांना याबाबत सांगितले. तेव्हा देवांशच्या घरच्यांनी सुवर्णमध्य काढला. 

वाचाः सेंकड हँड कार विकत घेताय, नुकसान होण्याआधी हा अहवाल एकदा वाचाच

देवांशने सिवनी येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली. मुलांसमोर उभा असलेला पेच पाहता त्यांनी सिवनी येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय पंडित राजेंद्र पांडे यांच्यासोबत चर्चा करुन लग्नाची तारिख पक्की केली. त्याचेवेळी त्यांन भटजींना ऑनलाइन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लग्न लावण्याचा पर्याय सुचवला. 

देवांशचे कुटुंबीय आणि सुप्रियाच्या कुटुंबीयांनी लग्नाचे सर्व प्रश्न सोडवल्यानंतर अखेर अमेरिका गाठली. तिथे पोहचताच लग्नाची प्रत्यक्ष तयारी सुरू झाली. लग्नाला भटजीबुवा प्रत्यक्षच उपस्थित नसल्याने सर्व कसं पार पाडणार याची धाकधुक सर्वांच्याच मनात होती. अखेर तो दिवस उजाडलाच. २१ मे रोजी राजेंद्र पांडे यांनी सर्व विधीनुसार ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून देवांश आणि सुप्रियाचे लग्न लावले. यावेळी लग्न समारंभासाठी दोघांच्या कुटुंबीयासह मित्र- मैत्रिण उपस्थित होते. 

देवांश आणि सुप्रियाचे लग्न लावण्यासाठी भटजींनी ५१०० अमेरिकन डॉलर इतकी दक्षिणा घेतली. म्हणजेच, भारतीय रुपयांनुसार, जवळपास ४ लाख २० हजार इतकी दक्षिणा त्यांनी घेतली. अमेरिकेत लग्न लावण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. हिंदू रिती-रिवाजानुसार विवाह संपन्न झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

दरम्यान, सोशल मीडियावर या विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. तसंच, जोडप्याने केलेला हा इंडियन जुगाड पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.