सेंकड हँड कार विकत घेताय?, नुकसान होण्याआधी हा अहवाल एकदा वाचाच

Second Hand Car Buying Fraud: सेंकड हँड कार किंवा बाइक विकत घेताय?, त्याआधी ही बातमी काळजीपूर्वक वाचाच

Updated: May 26, 2023, 12:51 PM IST
सेंकड हँड कार विकत घेताय?, नुकसान होण्याआधी हा अहवाल एकदा वाचाच title=
How To Avoid Second Hand Cars Scams: A Guide For First-Time

मुंबईः सर्वसामान्यांच्या घरात आता कार एक आवश्यक घटक बनला आहे. नवी कोरी कार खरेदी करण अजूनही अनेकांच्या अवाक्याबाहेर आहे. अशावेळी लोकांचा कल सेकंड हँड कारकडे अधिक असतो. सेंकड हँड कार विकत घेण्याचे प्रमाणही अधिक आहे. तसंच, त्याचे मार्केटही वाढते आहे. एका अहवालानुसार, सेंकड हँड कारचे मार्केट जवळपास २३ अरब डॉलर इतका आहे. मात्र, सेंकड हँड कार खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवण्याचीही गरज आहे. 

कार खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

देशभरात कारचोरीचे एक रॅकेट सक्रिय आहे. विविध भागातून कार चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. ज्या जुन्या कार आहेत त्या भंगारात विकल्या जातात. तर, नवीन कार पुन्हा दुरुस्त करुन व ओळखता येणार नाही अशापद्धतीने पुन्हा विक्री करण्यात येते. अलीकडेच गाजियाबाद पोलिसांनी अशाच एका रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या टोळीतील चोरटे  चोरीच्या कार ओएलएक्सवर विकत होते. गाडीची नंबर प्लेट बदलवून OLXवर कारच्या विक्रीची जाहिरात करत होते. 

ओएलएक्सवरुन कार विकत घेताना

पोलिसांना या रॅकेटबाबत खबर मिळताच त्यांनी छापेमारीकरत हे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. तसंच, ८ नंबर प्लेट बदलून ओएलएक्स साइटवर जाहिरात केलेल्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. यात स्कॉर्पियो, फॉर्च्युनरसह आठ महागड्या गाड्या आहेत. या टोळीतील सदस्य गाडी चोरल्यानंतर इंजन आणि चेसी नंबर बदलवून गाडीचे खोटे कागदपत्रे बनवून नंतर ओएलएक्सवर विकत होते. OLXवरुन हजारो लोक गाडी विकत घेतात. याचाच फायदा घेत हे लोक चोरीची गाडी स्वस्त किंमतीत विकत होते. जेणेकरुन लोकं त्यांच्या फसवेगिरीला बळी पडतील. पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या आहेत. 

12 वेळा विकली एकच कार

यापूर्वी घडलेल्या एका घटनेत व्यक्तीने १२ वेळा एकच कार विकली होती. आपल्या मित्राच्या कारला एक चिप लावून ती OLXवर १२वेळा विकली होती. उत्तर प्रदेशमध्ये राहणारा एक व्यक्ती ओएलएक्सच्या माध्यमातून कार विकत होता. त्यावेळी त्याने कारवर एक चिप लावली होती. त्यामुळं कारचे लोकेशन त्याला कळत होते व तिथून तो कार चोरी करत होता. व पुन्हा चोरीची कार दुसऱ्या व्यक्तीला विकत होता. 

चोरीची बाइक 

महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. राहुल कुमार नावाचा व्यक्ती दुचाकी चोरायचा. वेगवेगळ्या भागात बाइक चोरी करुन त्याची नंबरप्लेट बदलवून आणि बनावट दस्तावेज बनवून ओएलएक्सवर विकत होता. चोरीच्या तीन ते चार बाइक त्याने विकल्या होत्या.