Bandhavgarh Tiger Reserve : कोणाच्याही समोर वाघ उभा ठाकला तर हातपाय थरथरू लागतात. पण, मध्य प्रदेशातील एका महिलेनं मात्र या वाघालाही पळवून लावत आपल्या लेकराचा जीव वाचवला आहे. सध्या या महिलेच्या धाडसाचीच चर्चा देशभरात सुरु आहे. (mother risked her life and rescued her child from tiger in bandhavgarh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Madhya Pradesh) मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात असणाऱ्या रोहनिया ज्वालामुळं गावात ही घटना घडली. बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला (Bandhavgarh Tiger Reserve) लागूनच असणाऱ्या या गावातील रहिवासी भोला चौधरी यांच्या पत्नीनं वाघाशी सामना केला. 


अर्चना (Sunday) रविवारी सकाळी त्यांच्या मुलाला शौचासाठी म्हणून नजीकच्या जागेत घेऊन गेल्या होत्या. तितक्यातच तिथे नजर रोखून बसलेल्या वाघाानं कुंपणावरून येत चिमुरड्याला जबड्यात धरलं. 


वाचा : वाघ नाही तर सिंहालाच का म्हणतात जंगलाचा राजा? यामागचं कारण माहित आहे का?



15 महिन्यांच्या लेकाचा जीव धोक्यात असल्याचं पाहून अर्चना यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या प्राण्याशी झुंज दिली. 20 मिनिटं त्यांनी वाघाशी टक्कर दिली. या प्राण्याची नखं त्यांच्या छातीत घुसली होती. पण, तरीही त्यांनी त्याला सहजासहजी सोडलं नाही. (Tiger Attack)


अर्चना वाघाशी लढत असताना त्यांच्या किंचाळण्याचा आवाज गावात आला आणि गावकरी तातडीनं हातात लाठ्याकाठ्या घेऊन त्यांच्या मदतीसाठी धावले. समोरून येणारी गर्दी पाहून वाघानं पळ काढला. लेकाचा जीव वाचला पण, अर्चना यांची प्रकृती मात्र गंभीर असल्यातं सांगण्यात येत आहे. सध्या त्यांना प्रकृतीसाठी जबलपूर येथे नेण्यात आलं आहे.