वाघ नाही तर सिंहालाच का म्हणतात जंगलाचा राजा? यामागचं कारण माहित आहे का?

 सिंह हे आळशी असतात. त्यांना फक्त जेव्हा खायचे असते तेव्हाच ते काम करतात.

Updated: Jul 29, 2021, 10:10 PM IST
वाघ नाही तर सिंहालाच का म्हणतात जंगलाचा राजा? यामागचं कारण माहित आहे का?

मुंबई : सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो, तर वाघाला आपण राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखतो. परंतु असे असले तरी दोघेही तेवढेच धोकादायक आहेत. त्यामुळे माणसाला किंवा कोणत्याही अन्य प्राण्यांना यांच्यापासून लांब रहाण्याचे सल्ले दिले जातात. बऱ्याच लोकांना वाघ किंवा सिंहाचे हिंदीमध्ये नाव घेतले की वाघ आणि शेर सारखेच वाटतात. परंतु हे दोन्हीही वेगळे आहे.सिंह आणि वाघ दोघेही घातक असले तरी त्याच्यात खूप फरक आहे. ज्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सिंह आणि वाघ हे दिसायला एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. वाघाच्या शरीरावर काळे पट्टे असतात तर सिंहाच्या अंगावर असे काही नसते.

वाघ हा सिंहांपेक्षा लांब, जड आणि बलशाली असतो. त्याचप्रमाणे वाघ सिंहापेक्षा चपळ, उत्सफूर्त असतात, तर सिंह हे आळशी असतात. त्यांना फक्त जेव्हा खायचे असते तेव्हाच ते काम करतात.

सिंह कळपात राहतात, वाघ एकटे आहेत

सिंह बहुतेकदा कळपात असतात आणि त्यांच्या सामाजिक वर्तनामुळे ते अनेक सिंहासह जगणे पसंत करतात. सिंहाच्या कळपांना ‘प्राइड’ म्हणून ओळखले जाते. परंतु वाघांना एकटे राहायला आवडते.

सिंहाच्या प्रत्येक कळपात एक नर सिंह कळपाचे नेतृत्व करतो आणि त्यात मादी समुहासाठी शिकार करतात. परंतु वाघांमध्ये, नर किंवा मादी, स्वत: ची शिकार स्वत:च करतात. ते अन्नासाठी कोणावरही अवलंबून नसतात.

त्याचप्रमाणे वाघाला आपले खाणे कोणालाही वाटणे आवडत नाही. वाघ नेहमी रात्रीच शिकार करतात तर सिंह हे दिवस असो किंवा रात्र ते कोणत्याही वेळेला शिकार करण्यासाठी तयार असतात.

सिंह एकाच वेळी 50 मैल वेगाने वेग धावू शकतो. तर वाघ 55 मैल वेगाने धावू शकतो.

वाघांना पाण्यात राहाणे आवडते. म्हणूनच त्यांना बर्‍याचदा ते अशा ठिकाणी राहणे पसंत करतात जिथे आजूबाजूला पाणी आहे. सिंह दिवसाला 13 तास झोपेत घालवते, तर वाघ दिवसात 20 तास झोपू शकतो.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, वाघ 20 तास झोपतो जेणेकरुन तो दुसर्‍या दिवसाच्या शिकारसाठी स्वतःला तयार करतो. तो सिंहासारखा आळशी नाही.

हे सगळं वाचल्यानंतर तुम्ही विचार कराल की, इतका आळशी असुन देखील सिंहालाच जंगलाचा राजा का म्हणतात?

तर याचे कारण असे सांगितले जात आहे की, सिंह हा जंगलातील असा प्राणी आहे जो त्याचा कुटुंबासोबत राहातो. सिंहाच्या कळपात तो एकटाच नर असतो, तर बाकी सगळ्या मादा असतात. जेव्हा मादा शिकार करण्यासाठी बाहेर पडते, तेव्हा सिंह एकटा त्याच्या मुलांचे आणि त्याच्या क्षेत्राचे रक्षण करतो, ज्यामुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते.