लखनऊ : भारतात अनेक ठिकाणी रस्ते हे खराब (bad road) स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी तर अजून काँक्रिट रस्तेच लोकांना पाहायला मिळालेले नाहीत. रस्त्यांची अवस्था दरवर्षी खराब होते. लोकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. पण आता याच समस्येवरुन खासदाराच्याच आईन खासदाराला फटकारलं आहे. भाजप खासदारला (BJP MP) आईकडूनच खराब रस्त्यांमुळे बोलणं खावी लागली. त्यानंतर खासदार आणि अभिनेत्याने आईला सांगितलं की काम होऊन जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजमगड (Azamgarh) चे खासदार दिनेश लाल निरहुआ (Dinesh Lal Yadav Nirahua) यांना आपल्याच आईकडून खराब रस्त्यांमुळे ऐकून घ्यावं लागलं. दिनेश लाल निरहुआ यांनी त्यानंतर आईला आश्वासन दिलं की. सीएम योगी आदित्यनाथ यांनी रस्ते सुधारण्यासाठी आदेश दिले आहेत. नोव्हेबरपर्यंत रस्ते दुरुस्त केले जातील.


आजमगडचे खासदार आणि भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ यांच्या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते जनता दरबार देखील भरवतात.


दिनेश लाल यादव निरहुआ यांची आई चंद्रज्योती देवी एका मंदिरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना खराब रस्त्यावरुन प्रवास करावा लागला. त्यानंतर त्यांना खासदार मुलाला फोन लावला आणि खराब रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी रस्ते लवकरच दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं.


एका टीव्ही चॅनेल सोबत बोलताना खासदार दिनेश लाल यादव निरहुआ यांनी सांगितले की, माझी आई नेहमी सांगते की, जे काम हातात घेतलं ते पूर्ण केले पाहिजे. निवडणूक लढवताना देखील आईने सांगितले होते की, एक काई आधीच करतोय. दुसरं पण करु शकणार आहेस का?


लोकसभा पोटनिवडणुकीत भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ यांना सपाचे उमेदवार आणि अखिलेश यादव यांचा चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला होता.