`नाच नाच मेरी रानी` गाण्यावर बेधुंद होऊन नाचले माय-लेक, नोराला ही मागे टाकलं
आई-मुलाचा डान्स इतका जबरदस्त आहे की खुद्द नोरा फतेहीही हा डान्स पाहून यांची फॅन होईल.
नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक गुरु रंधावा आणि नोराचं नाच मेरी रानी हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं. या गाण्याची भुरळ अनेक सेलिब्रिटींसह तरुणांना पडली आणि सोशल मीडियावर रिल्स सुरु झाले. सध्या मायलेकाचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे दोघांनीही खूप सुंदर डान्स केला आहे.
आई-मुलाचा डान्स इतका जबरदस्त आहे की खुद्द नोरा फतेहीही हा डान्स पाहून यांची फॅन होईल. व्हिडीओमध्ये आई आणि मुलगा दोघांचाही डान्स करतानाचा उत्साह पाहण्यासारखा आहे. मुलाचे हावभाव देखील खूप सुंदर आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये आई-मुलाची जोडी 'नच मेरी रानी' गाण्यावर स्टेप-टू-स्टेप डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्सही आई-मुलाच्या जोडीला खूप लाईक करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ आईने तिच्या lohi_ravi इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.आतापर्यंत या व्हिडीओला 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
आई साडीमध्ये इतक्या उत्तम स्टेप्स करताना दिसत आहे. आईचा फिटनेस पाहून चाहत्यांनीही कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे. नोरा फतेहीचं सोशल मीडियावर 'नच मेरी रानी' गाण्यावर अनेकांनी रिल्स तयार केल्या आहेत.