भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. चौहान यांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chuouhan has tested positive for coronavirus COVID-19)  मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर ही माहीती शेअर केली आहे. मी कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी क्वारंटाईन झालेलो आहे, असे त्यांनी ट्टिट केले आहे.  माझ्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री चौहान यांनी लोकांनी घाबरुन जावू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगत कोविड-१९वर वेळेवर उपाय झाला की व्यक्ती कोविडवर सहज मात करते. मी २५ मार्चपासून कोविड-१९बाबात माहिती घेत आहे आणि काम करत आहे. आता मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती घेत राहणार आहे. माझ्या अनुपस्थितीत गृहमंत्री, नगरविकास मंत्री आणि आरोग्य, शिक्षणमंत्री राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवतील, असे ट्विट मुख्यमंत्री चौहान यांनी केले आहे.



शनिवारी भारतातील कोरोनाव्हायरसचे एकूण प्रमाण १३ लाखांवर गेले आणि दोनच दिवसांत १२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १३ लाख ३६ हजार ८६१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३१ हजार ३८८ लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत ८ लाख ४९ हजार ४३२ लोक बरे झाले आहेत. कोरोना अॅक्टीव्ह बाधितांची संख्या ४ लाख ५६ हजार ७१ इतकी असून कोरोना बरे होण्याचे प्रमाण ६३.५३ टक्के इतके आहे. गेल्या २४ तासात ७८७ लोकांचा बळी गेला आहे.