Madhya Pradesh Crime News :  श्रद्धा वालकर (shraddha walker) हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. श्रद्धाचा लिव इन पार्टनर आफताब पुनावालाने (Aaftab Poonawala) याने तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन ते जंगलात फेकले. मात्र, या पेक्षा भयानक घटना सन 2019 मध्ये घडली होती. मध्य प्रदेशातील हे प्रकरण आहे.  एका तरुणाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तब्बल 70 तुकडे करण्यात आले होते.  लोकांचा जीव वाचवणाऱ्या एका डॉक्टरनेच हे हैवानी कृत्य केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील नर्मदापुरम (होशंगाबाद) येथे 2019 मध्ये म्हणजेच चार वर्षांपूर्वी हे धक्कादायक हत्याकांड घडले होते.  सुनील मंत्री (वय 55 वर्षे) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. वीरेंद्र पचौरी उर्फ ​​वीरू (वय 30 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. वीरु हा सुनील मंत्री याच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. 


2019 मध्ये डॉ. सुनील मंत्री याची इटारसी येथील सरकारी रुग्णालयात ऑर्थोपेडिक तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  वीरु  हा या डॉक्टरकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. एक दिवस विरुने दात दुखत असल्याची तक्रार केली. डॉक्टरने उपचार करण्याच्या बहाण्याने त्याला घरी बोलावले. यानंतर त्याला एक इंजेक्शन दिले. यामुळे विरु बेशुद्ध झाला. यानंतर डॉक्टरने त्याचे धड करवतीने कापले यानंतर त्याच्या मृतदेहाचे 70 तुकडे केले.


असे उघडकीस आले हत्याकांड


डॉक्टरने विरुच्या मृतदेहाचे 70 तुकडे केले होते. हे तुकडे त्याने घरातच अ‍ॅसिडने भरलेल्या ड्रममध्ये भरुन ठेवले होते. डॉक्टरच्या घरातून विचित्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी  पोलिसांना हा ड्रम सापडला. पोलिसांनी तात्काळ या डॉक्टरला अटक केली.


डॉक्टरने ड्रायव्हरची हत्या का केली?


पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर डॉक्टरने हत्येची कबूली दिली. तसेच हत्येमागचे कारण पोलिसांना सांगितले. डॉक्टरच्या पत्नीचे ब्युटी पार्लर होते. विरुची पत्नी याच ब्युटी पार्लर मध्ये काम करत होती. यादरम्यान  डॉक्टरच्या पत्नीचे निधन झाले. यानंतरही विरुची पत्नी हे  ब्युटी पार्लर चालत होती. यामुळे वीरुची पत्नी डॉक्टर यांच्यातील जवळीक वाढली. यांच्यात अनैतिक संबध होते. याबाबत विरुला समजले यावरुन त्याने डॉक्टरशी वाद घातला. मात्र, वीरुची पत्नी आणि डॉक्टरने त्याला असं काहीच नसल्याचे सांगितले. यानंतर डॉक्टरने विरुचा कायस्वरुपी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या हत्येचा कट रचला.  न्यायालयाने आरोपी डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.