हेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच...
पेट्रोलपंवर मोटरसायकलने दोन आरोपी आले त्यांनी तिथं उभ्या असलेल्या एका तरुणीला बाईकवर बसवत तिचं अपहरण केलं. मुलगी मदतीसाठी आरडा-ओरडा करत होती, पण आरोपी तिला घेऊन फरार झाले. शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण पोलीस तपासात वेगळंच सत्य समोर आलं.
Kidnnaping News : शहरात दिवसाढवळ्या घटलेल्या अपहरणाच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मोटरसायकलवरुन आलेल्या दोन आरोपींनी एका तरुणीचं अपहरण (Kidnapped) केलं. मुलगी मदतीसाठी आरडा-ओरडा करत होती, पण आरोपी तरुणीला घेऊन फरार झाले. या घटनेने पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं. अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आणि तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. ज्या तरुणीचं अपहरण झालं ती तरुण आरोपींबरोबर एकाच हॉटेलमध्ये सापडली.
तपासात धक्कादायक सत्य समोर
मध्यप्रदेशमधल्या ग्वालिअरमधलीही (Gwalior) घटना आहे. ग्वालिअर चंद्रबदनी नाका पेट्रोल पंपावरुन एका तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मोटरसायकलवरुन दोन आरोपी आले आणि त्यांनी तरुणीला मोटरसायकलवर बसवून तिचं अपहण केलं. दिवसाढळ्या घडलेल्या या घटनेने ग्वालिअर पोलिसांवर जोरदार टीका झाली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. तपासात जसजसा एकएक पुरावा समोर येत गेला तसतसं अपहरणाची कहाणी बनाव अल्याचं समोर आलं. 19 वर्षांची तरुणी आणि आरोपी रोहित कुशवाह गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांनी मिळून घरच्यांना चकमा देण्याचा कट आखला होता.
कटानुसार आरोपी रोहितने आपल्या मित्रासोबत चंद्रबदनी नाका पेट्रोलपंपावरुन तरुणीचं अपहरण केलं. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने लोकांना अपहरणाची ही घटना खरी वााटली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं, यावेळी आरोपींनी मोटरसायकल गुनाच्या दिशेने नेल्याचं कळलं. आरोपींनी रस्त्यातच मोटरसायकल फेकून दिली आणि बसने त्या तिघांनी गुना गाठलं आणि तिथल्या एका हॉटेलमध्ये रुम बूक केला. रोहितने आपली पत्नी अल्याचं हॉटेलमध्ये सांगितलं.
पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ट्रॅक करुन दोघांचा शोध लावला. यानंतर पोलिसांनी गुनामध्ये धडक मारत आरोपी रोहित आणि त्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या दोघांचे प्रेमसंबंध होते. पण दोघांच्या घरच्यांचा विरोध असल्याने दोघांनी अपहरणाचा कट रचला. पण पोलिसांनी काही तासातच शोध घेत दोघांना ताब्यात घेतलं. मुलीला तिच्या कुटुंबिंयांच्या स्वाधिन करण्यात आलं असून आरोपी रोहितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या घटनेचा शोध लावल्याने टीका करणाऱ्यांनी आता पोलिसांचं कौतुक केलं आहे.