गुटखा खा, दारु प्या, काही करा पण...; अतिउत्साहाच्या भरात BJP नेते बरळले
Political News : नेतेमंडळींची मानसिकता अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडते. ही तीच माणसं आहेत ना, ज्यांना आपण निवडून दिलंय? हाच विचार वारंवार मनात घर करतो.
BJP MLA Viral Video : आपल्या देशात तऱ्हेवाईकांची संख्या कमी नाही. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल. कारण, ज्यांच्या हाती मतदार देशाचं भवितव्य सोपवतात, ज्यांना जनतेचे प्रतिनिधी म्हणून दिल्ली दरबारी पाठवतात, त्याच नेतेमंडळींची मानसिकता अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडते. ही तीच माणसं आहेत ना, ज्यांना आपण निवडून दिलंय? हाच विचार वारंवार मनात घर करतो.
एकाएकी राजकीय नेतेमंडळींबाबत हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांचा व्हिडीओ. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मध्य प्रदेशातील रेवामधील भाजप (BJP) खासदार जनार्दन मिश्रा (janardan Mishra) हे नागरिकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. (mp rewa consume liquor eat gutkha chew tobacco bjp mp janardan mishra tips on water conservation political news marathi)
वाचा : अब्दुल सत्तार यांना 'ते' वाक्य भोवणार, का होतेय सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी? पाहा VIDEO
(Save Water) पाणी वाचवण्याचा संदेश देतादेता उत्साहाच्या भरात मिश्रा यांनी भलताच सल्ला उपस्थितांना दिला आणि ऐकणारे, पाहणारेही हैराण झाले. कारण, त्यांनी चक्का गुटखा खाण्याचाच सल्ला दिला.
नेमकं काय म्हणाले जनार्दन मिश्रा?
(Save water Campaign) पाणी वाचवा मोहिमेच्या निमित्त आयोजित एका कार्यशाळेत मिश्रा बोलत होते. यादरम्यान ते म्हणाले, 'नदी, तलावातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. पाण्याच्या नावाखाली एक थेंबही उरलेला नाही. दरवर्षी पाण्याची पातळी घटत चालली आहे. आपण पृथ्वीत पाणीसाठा करण्याऐवजी तो संपवत चाललो आहोत.'
इतक्यावरच न थांबता आपण पाणी वाचवतच नाही आहोत, त्यामुळं येत्या काळात संपूर्ण पृथ्वीवरच पाण्याचा तुटवडा जाणवू लागेल, असं म्हणत त्यांनी अजब सल्ला देण्यास सुरुवात केली.
असा सल्ला कुणी देतं का?
'वायफळ खर्च करा, गुटखा खा, दारु प्या, गांजा घ्या, थिनर- सोल्यूशन कशाचाही नशा करा, जे वाटतंय ते करा. कारण आमच्या सांगण्यानं लोक ऐकणार नाहीत. त्यामुळं काहीही करा, पण पाणी वाचवा आणि त्याचं महत्त्वं जाणून घ्या', असं म्हणताच मिश्रा यांनी सर्वांच्या नजरा वळवल्या.
भाजप नेत्यांचा संदेश चांगला होता, त्यामाच्या त्यांच्या भावनाही चांगल्या होत्या; पण तो संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची पद्धत काहीशी चुकली आणि सोशल मीडियावर हा विचित्र सल्ला ऐकून एकच हशा पिकला.