मध्य प्रदेशातील (MP) सतना जिल्ह्यातील काँग्रेस (congress) आमदार सिद्धार्थ कुशवाह (Siddharth Kushwaha) आणि कोटमाचे आमदार सुनील सराफ ( Sunil saraf) यांच्यावर महिलेसोबत गैरवर्तनाचा आरोप केला आहे. रेवांचल एक्स्प्रेसमध्ये (rewanchal express) प्रवास करणाऱ्या महिलेने आमदार दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला आहे. असभ्य वर्तन करणारे दोन्ही आमदार दारूच्या नशेत होते असे महिलेने सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने फोनवरून या घटनेची माहिती तिच्या पतीला दिल्याची माहिती समोर आलीय. यानंतर महिलेच्या पतीने रेल्वेमंत्री, रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधानांना ट्विटरवर (twitter) टॅग करत मदत मागितली होती. ट्विटवर या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कारवाई करण्यात आली. दमोह-सागर (sagar) या पुढील स्थानकावर फोनवरून माहिती पाठवून सूचना देण्यात आल्या. ट्रेन रेवांचलला (rewanchal) पोहोचण्यापूर्वी जीआरपीएफ (GRPF) आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांसह (RPF) सागर स्टेशनवर (sagar railway station) पोहोचले होते. ट्रेन स्टेशनवर आल्यानंतर पोलिसांनी महिलेकडे घडलेल्या प्रसंगाबाबत चौकशी केली. यावेळी महिलेने आमदारांवर दोघेही दारूच्या नशेत मला शिवीगाळ करत होते असे पोलिसांना सांगितले.


रात्री सागर जीआरपीकडे महिला अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या महिलेला बीना येथे तक्रार नोंदवण्यास सांगितले. पोलीस फौजफाट्यासह महिला बीनाकडे रवाना झाली. बीना येथे महिला निरीक्षक श्वेता पीडितेची तक्रार नोंदवणार होत्या. मात्र नियंत्रण कक्षाच्या आदेशानंतर महिलेला भोपाळला नेण्यात आले. 


जीआरपी अधिकारी अहिरवार यांनी सांगितले की, "आम्हाला जबलपूर नियंत्रण कक्षाकडून या घटनेची माहिती मिळाली होती. एक सहाय्यक उपनिरीक्षक आणि हवालदार ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी महिलेला दुसरी सीट दिली. त्यांनी महिलेचा जबाब नोंदवले आणि दोन आमदारांविरुद्ध आयपीसी कलम 354 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला."


महिलेच्या पतीने सांगितले की, "आरोपी काँग्रेसचा आमदार आहे की नाही हे आम्हाला माहित नाही, पण आभारी आहे की पोलिसांनी तातडीने कारवाई करून माझ्या पत्नीला मदत केली." त्याचवेळी स्वतःवरील आरोप फेटाळून लावत काँग्रेस आमदार सिद्धार्थ कुशवाह म्हणाले की, 'महिला एका मुलासोबत प्रवास करत होती म्हणून मी तिला माझी सीट देऊ केली. सुनील सराफ यांनी जेवण मागवले. मला कळत नाही की त्यांना वाईट का वाटले आणि तक्रार का दाखल केली. आमच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत.