नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. देशात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. आरक्षणाचा प्रश्न चिघळत आहेत. मात्र, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलायला तयार नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केलेय. त्याचवेळी त्यांनी मोदी यांना नवं नाव ठेवलंय. त्याबाबत त्यांनी ट्विटही केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये मोदींचा उल्लेख मि. ५६ असा केला आहे. 'मि. ५६ यांच्या 'बेस्ट बडी'ने मला भाजपच्या राज्यात दलित आणि आदिवासींविरुद्ध होत असलेल्या अन्यायाबद्दल पडताळणी करायला सांगितलं होते. मी आशा करतो की मी खाली दिलेल्या लिंकमुळे मि. ५६ आणि त्यांचे बेस्ट बडी (घनिष्ट मित्र) यांना त्यांच्या गाढ झोपेतून जाग येईल आणि तशी ती आली नाही तर मी आणि काँग्रेस ती आणून देऊ' असं ट्वीट करताना राहुल यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही निशाणा साधलाय.



दरम्यान, भाजपच्या राज्यात दलित आणि आदिवासींवरील वाढत्या हल्ल्यांच्या मुद्द्यावरुन भाजपवर सातत्याने राहुल गांधी यांनी टीका केलेय. आता पंतप्रधान मोदी यांना नवीन नावं ठेवल्याने याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागलेय. आपल्या ट्विटर हँडलवरून हे नाव शेअर करत त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीका केली आहे. या ट्वीटसोबत त्यांनी इंडिया टुडेचे न्यूजट्वीट जोडले आहे.