Gautam Adani: दणक्यावर दणके! गौतम अदानींना आणखी एक झटका, 4 कंपन्यांचे पंख छाटले...
Adani Free Float Cuts: अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या समोरची संकट काही केल्या कमीच होत नाहीत. आता इंडेक्स प्रोवाईडर MSCI या कंपनीनं अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या शेअरच्या फ्री फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे.
Adani Free Float Cuts: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे गौतम अदानी यांची. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर (Hindenburg vs Adani) मात्र गौतम अदानी यांना मार्केटमध्ये झटक्यावर झटके मिळत आहेत. सर्वप्रथम त्यांचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादींतून नावं काढून टाकण्यात आले त्यानंतर त्यांनी संपत्तीही एका झटक्यात कमी झाली त्यामुळे अदानींच्या मागचं शुक्लकाष्ट काही केल्या संपत नाहीये. आता अजून एका कंपनीनं गौतम अदानी यांना मोठा झटका दिला आहे. त्यामुळे आता गौतम अदानींचे नावं पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यामुळे आता अदानींचे काय होणार हा प्रश्न सगळीकडेच डोकावतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अदानींच्या चार कंपन्यांचे या कंपनीनं पंख छाटून टाकले आहेत. त्यामुळे अदानी आता पुढे कोणतं पाऊल टाकणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. (MSCI cuts off adani groups four companies free float status read the full article)
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या समोरची संकट काही केल्या कमीच होत नाहीत. आता इंडेक्स प्रोवाईडर MSCI या कंपनीनं अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या शेअरच्या फ्री फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे. यामुळे अदानी समूहाच्या इंडेक्समध्ये त्यांचे वेटेज कमी होऊ शकते. नुकत्याच आलेल्या रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, MSCI नं असं म्हटलं आहे की, अडानी ग्रुपची फ्लेगशिप कंपनी अदानी इंटरप्राईजेज, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि एसीसी या कंपन्याच्या फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे. हा बदल मार्चपासून लागू होणार आहे. MSCI च्या एमर्जिंग मार्केट्स इंडेक्स मध्ये या चारही कंपन्यांचे कंबाईंड वेटेज हे 0.4 टक्के इतके आहे.
फ्री फ्लोटिंग स्टेटस काय असतं?
एखाद्या कंपनीचे बाजार भांडवल कमी झाले किंवा वाढले आहे याबद्दल आपल्याला अनेकदा अपडेट्स मिळत असतात. त्यातून आपल्या कंपनीच्या भांडवलाप्रमाणे (Capitialisation) त्या कंपनीचे मार्केट कॅप्सही माहिती असतात. मार्केट कॅपमध्ये स्मोल, लार्ज आणि मीडियम असे थर असतात. याचा संबंध हा फ्री फ्लोटिंग स्टेटशी आहे. तेव्हा जाणून घेऊया की हे फ्री फ्लोटिंग स्टेटस नक्की आहे तरी काय? कंपनीच्या एकूण बाजार भांडवलाची गणना करताना सरकार, खाजगी आणि इतर कंपन्यांच्या शेअर हे शेअरच्या किमतीनं गुणले जातात. पण फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये (Free Float Capitalisation) सरकार किंवा खाजगी कंपन्यांकडे असणारे शेअर हे वेगळले जातात. जे लोकं हे व्यापाराकडे लक्ष देतात त्यांच्याकडे मग फ्री फ्लोटिंग घेतले जाते. त्यानुसार मग शेअरच्या किमतीनं त्यांचा गुणाकार होतो.
फ्री फ्लोटिंग स्टेटसमध्ये इंडेक्स कंपन्या कधी आणि कशी कपात करू शकतात?
सध्या समोर आलेल्या हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे, अदानी ग्रुपची त्रेधातिरपिट झाली आहे त्यामुळे सध्या अनेक कंपन्या या मोठ्या प्रमाणात अदानी ग्रुपचे हक्क काढून घेण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यातलाच हाही एक प्रकार आहे.