अहमदाबाद : गुजरात किनारपट्टी जवळील मर्चंट नेव्हीच्या एका तेल टँकरला आग लागली. टॅंकरमध्ये 30,000 टन हाय-स्पीड डिझेल होतं.


आगीचं कारण अस्पष्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आग का लागला यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. तेल समुद्रात गेलं की नाही याबाबत अजून माहिती नाही. तेल टँकर एमटी गणेश गुजरातच्या दीनदयाल बंदरापासून 15 नॉटिकल मैल अंतरावर आहे.


26 जणांना वाचवलं


माहितीनुसार आग बुधवारी संध्याकाळी 6 वाजता लागली. भारतीय तट रक्षकांनी लगेचच चालक दलाच्या 26 सदस्यांना लगेच तेथून सुरक्षित स्थानी हलवलं. 2 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले. एका तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की 'चालक दलाच्या डब्याला आग लागली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.


विमानाची मदत


संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक इंटरसेप्टर बोट सी -403 ही घटनास्थळी आहे. समुद्र सुरक्षा एजन्सीच्या प्रदूषण नियंत्रण टीमला सक्रिय करण्यात आले आहे. आगीच्या स्थितीच्या माहितीसाठी डॉर्नियर विमान लावण्यात आलं आहे.