Mukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?
Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे.
Reliance Jio To Acquire RITL : रिलायन्स इंडस्ट्रीचे संचालक धीरूभाई अंबानी यांचे (Dhirubhai Ambani) सुपुत्र मुकेश (Mukesh Ambani)आणि अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यातील तफावत हा बिजनेस जगतात नेहमीच चर्चिला जाणारा विषय आहे. वडिलांच्या निधनानंतर या दोन भावांमध्ये संपत्तीवरुन वाद झाला आणि त्यानंतर सख्खे भाव वैरी झाली. पण मोठा मुलगा मुकेश अंबानी रोज यशाचं शिखर गाठतं आहेत तर अनिल अंबानी मात्र कर्जात बुडतं आहेत. पण अखेर भाऊच भावाच्या मदतीला धावून आला आहे. संकटात सापडलेल्या भावाला तारण्यासाठी मुकेश अंबानी यांनी मदतीची हात पुढे केला आहे.
तोट्यात असलेली RITLला रिलायन्स जिओ घेणार
मुकेश अंबानी हे अनिल अंबानी यांची कंपनी खरेदी करणार आहेत. म्हणजेच रिलायन्स जिओ आता रिलायन्स इंन्फ्राटेलला खरेदी करणार आहेत. यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) मंजूरी दिली आहे. शिवाय NCLT ने रिलायन्स जिओला RCom चे टॉवर आणि फायबर मालमत्तांचे संपादन करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेत (SBI) एस्क्रो खात्यात 3,720 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. (Mukesh Ambani Anil AmbaniReliance Jio To Acquire RITL net worth)
2022 मध्ये सर्वात श्रीमंत उद्योगपतीमध्ये नाव (Mukesh Ambani and Gautam Adani Net Worth)
2022 हे वर्ष प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अदानी समुहाचे (Adani Group) चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) लकी ठरलं. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत यावर्षी 56.4 अब्ज डॉलरची वाढ झाली असून ते 133 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता सध्या $92.7 अब्ज डॉलर आहे. जगातील श्रीमंत यादीत मुकेश अंबानी हे 11 व्या स्थानावर आहेत.