Mukesh Ambani : `4G आणि 5G च्या पेक्षा...`; मुकेश अंबानींची मोठी घोषणा
Mukesh Ambani : 4G आणि 5G च्या पेक्षा एक महत्त्वाचा G असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.
Mukesh Ambani news : तरुण पिढी ही सोशल मीडियामागे (Social media) वेडी झाली आहे. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram), ट्वीटरवर (Twitter) लोकांचा कल वाढला आहे. त्यासाठी लागणारं नेटवर्क 4G आणि 5G साठी तरुण पिढी मागे लागली आहे. अशात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.
'4G आणि 5G च्या पेक्षा...'
गुजरातमधील (Gujarat) गांधीनगरात झालेल्या पंडित दीनदयाल ऊर्जा विद्यापीठाच्या (PDEU) दीक्षांत समारंभात मुकेश अंबानी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्तीबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, 4G आणि 5G च्या युगात आई आणि वडिलांपेक्षा मोठा 'जी' नाही. तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी तुमच्या पालकांनी केलेला संघर्ष आणि त्याग कधीही विसरू नका, असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. (mukesh ambani Big announcement 4g and 5g)
मुकेश अंबानी फॅमिली मॅन
मुकेश अंबानी हे एक फॅमिली मॅन आहे. ते अनेक कार्यक्रमामध्ये संपूर्ण अंबानी कुटुंबासोबत उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला हा खूप अनमोल आहे. तसंच त्यांनी यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलही मोठे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलकवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यशाचं गुरुमंत्र
या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी त्यांचा यशाचं गुप्त उघडलं केलं. त्यासोबतच विद्यार्थ्यांना यशाचा गुरुमंत्राबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, थिंक बिग...थिंक ग्रीन आणि थिंक डिजिटल...(Think Big, Think Green and Think Digital) या तीन गुरुमंत्र जे आयुष्यात पाळले तर तुम्ही यशाचं शिखर गाठाल.