Mukesh Ambani यांनी Reliance AGM मध्ये ईशा अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी, संपत्तीतून...
RIL AGM : देशातील नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची आज 45 वी वार्षिक सामान्य बैठक (Annual general meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.
Reliance AGM 2022 : दरवर्षी प्रमाणे रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) कंपनीची आज 45 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक (Annual general meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानीने त्यांच्या मुलांसाठी वेगवेगळी जबाबदारी सोपवली आहे. रिलायंस रिटेलच्या (Reliance Retail) कामकाजाची जबाबदारी ईशा अंबानी (Isha Ambani) सांभाळेल अशी घोषणा केली आहे. त्यासोबतच, अकाश अंबानीकडे (Akash Ambani) रिलायंस जिओची (Reliance Jio) जबाबदारी दिली आहे.
रिलायंस रिटेलची (Reliance Retail) जबाबदारी ईशा अंबानीकडे...
रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (Annual general meeting) ईशा अंबानीकडे रिलायंस रिटेलची (Reliance Retail) जबाबदारी दिली. रिलायंस कंपनी लवकरच एफएमसीजी सेक्टरमध्ये (FMCG Sector) पदार्पण करणार आहे.
ईशाचं ऑनलाईन पेमेंट बद्दल प्रजेंटेशन...
आज झालेल्या एजीएममध्ये ईशा अंबानीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन किराना ऑर्डर करणे आणि ऑनलाईन पेमेंट करणे यासंबंधी एक व्हिडिओ दाखवला.
रिलायन्स समूहाची मुख्यत: या तीन क्षेत्रांमध्ये आहे गुंतवणूक...
रिलायन्स ग्रुपचे (Reliance Group) सध्या मुख्यतः 3 व्यवसाय आहेत. ऑइल रिफायनरी, पेट्रो-केमिकल आणि रिटेल आणि डिजिटल व्यवसायामध्ये गुंतवणूत आहे.
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे कंपनीचा तेल आणि एनर्जीची जबाबदरी त्यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीकेडे (Anant Ambani) देऊ शकतात.