नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी आपल्या रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत एक स्वप्न पाहिलं आहे.


मुंकेश अंबानींचं स्वप्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, 'मी आज जे आहे ते केवळ रिलायन्स मुळे. रिलायन्स ही जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये स्थान मिळवू शकते. आम्ही करु शकतो आणि आम्ही करु. येत्या दशकामध्ये जग जीवाश्म ईंधनापासून क्लीन एनर्जीकडे वाढेल. रिलायन्स क्लीन एनर्जी प्रोवाईडर म्हणून लीडर बनू शकतो.' फोर्ब्सच्या ताज्या क्रमवारीनुसार रिलायन्स जगातील टॉप कंपन्यांमध्ये १०६ व्या क्रमाकांवर आहे.


काय करणार रिलायन्स


अंबानींनी म्हटलं की, 'जग नव्या उत्पादनांचा शोध घेत आहे जे मनुफॅक्चरिंग आणि लोकांच्या जीवनात क्रांतिकारक बदल आणतील. काय रिलायन्स या नवीन वस्तूंच्या शोधात जागतिक उत्पादकांच्या कंपन्यांचं नेतृत्व करु शकतो? हां आम्ही करु शकतो आणि आम्ही करु. जिओ आणि रिटेल सह रिलायन्सने भारतामध्ये नवीन नेतृत्वाची स्थिती निर्माण केली आहे आणि आम्ही ग्राहकांसाठी समर्पित आहोत.'


अबांनींच्या यशामागचं कारण


पुढे ते बोलले की, 'आम्ही स्वर्णिम दशकामध्ये प्रवेश करीत आहोत. रिलायन्सने त्या विशेष परिस्थितीत आहे. ज्याबाबतीत जगातील काही मोजक्याच कंपन्या याचं स्वप्न पाहू शकता.' त्यांनी म्हटलं की, 'त्यांनी त्यांच्या वडिलांपासून एक धडा घेतला आहे. तो म्हणजे धाडस. याशिवाय कोणी काहीच मिळवू शकत नाही.'