मुंबई :  अंबानी कुटुंबातील (Ambani Family) सर्वात लहान सदस्य पृथ्वी आकाश अंबानी (Prithvi Ambani) अवघ्या दीड वर्षांचा आहे. त्याच्या रॉयल लाइफबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोट्यवधींच्या बर्थडे पार्टी आणि डिझायनर कपडे असं सर्व सुखसोयी पायाशी लोळण घालतात. आपण भारतातील आकर्षणाचे केंद्र बनलेल्या पृथ्वी अंबानीबद्दल जाणून घेणार आहोत. (mukesh ambani grandson prithvi school is special doctors always stay together live royal life)


सर्वात महागड्या शाळेत शिक्षण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी सध्या प्री-नर्सरीचं शिक्षण घेतोय.  पृथ्वीला काही महिन्यांपूर्वी मलबार हिलमधील सनफ्लॉवर नर्सरी स्कूलमध्ये घातलं. विशेष म्हणजे पृथ्वीचे वडील म्हणजेच आकाशही तिथेच शिकला आहे.


कडेकोट सुरक्षा


शाळेत पृथ्वीच्या सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये जोपर्यंत पृथ्वी शाळेत आहे तोपर्यंत त्याच्याभोवती साध्या गणवेशातील सुरक्षा रक्षक तैनात असतील,  जे संपूर्ण शाळेच्या परिसरावर लक्ष ठेवतील. पृथ्वीसोबत शाळेत एक डॉक्टरही उपस्थित असेल.